जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्ध आश्रम लासलगाव येथे आनंद काकडे व काकडे परिवारातर्फे विविध वस्तूंचे वाटप

0 291

निफाड,दि 05 (प्रतिनिधी)ः
कै श्री. मुरलीधर प्रल्हाद काकडे व कै श्री. सतीश मुरलीधर काकडे यांच्या स्मृती दिनानिमित्त लासलगाव येथील आश्रमाला काकडे परिवारातील सदस्य यांनी मित्र परिवारासोबत भेट दिली . आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी आश्रमाच्या कार्याची माहिती दिली . आश्रमात १ वर्षापासून तर ७ वर्षापर्यंत ची अनाथ मुले , मुली तसेच बरीच वृध्द मंडळी पण आहेत .आश्रमातील अनाथ मुले व मुलींना नवीन कपडे , वृध्दांना ब्लँकेट , तसेच सध्या सुरू असलेल्या कोविड परिस्थिती नुसार आश्रमासाठी वाफेचे मशीन अश्या स्वरूपाच्या वस्तू आमचे मित्र प्रतिक परदेशी , सुमेर मिसर , संतोष शिंदे , संकेत शिंदे , प्रसाद काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट देण्यात आल्या.आनंद काकडे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व कार्यक्रमासाठी सर्व मित्र परिवाराचे सहकार्य लाभले

error: Content is protected !!