पोलीस हक्क संरक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारणी जाहीर

0 16

 

परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः
परभणी येथे पोलीस हक्क संरक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारणी निवड संदर्भात उघडा महादेव परिसर काळी कमान रोड मातोश्री प्रतिष्ठान निवासी गुरुकुलात बैठक आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार प्राप्त श्री.मंचकराव बचाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष श्रीकांतभाऊ भोसले, दैनिक लोकपत्र जिल्हा प्रतिनिधि धाराजी भुसारे, पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदअण्णा भोसले,सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्याणराव साबळे, शेषराव सोपने मुख्य संपादक जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल व गोपीनाथ शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करुण पत्र देण्यात आले.
व्याख्याते विनोदअण्णा भोसले, मंचकराव बचाटे, श्रीकांतभाऊ भोसले आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यकारणी पुढील प्रमाणे जिल्हा सल्लागार शेषराव सोपने, ॲड.विनायक पारवे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पांगरकर, रामेश्वर बचाटे, प्रा. हनुमान जाधव,जिल्हा कार्याध्यक्ष आनंद साबणे, परभणी तालुकाध्यक्ष हेमराज चोपडे,उपाध्यक्ष दत्ता कदम,सचिव संजीव आधागळे,परभणी शहराध्यक्ष गंगाधर यादव,गंगाखेड तालुकाध्यक्ष वल्लभ क्षीरसागर,
पालम तालुकाध्यक्ष साहेबराव बंडे, पाथरी तालुकाध्यक्ष प्रा.अनिल कोल्हे,
पाथरी शहराध्यक्ष सुनील ढवळे,
पूर्णा तालुकाध्यक्ष मारोती कदम,उपाध्यक्ष विशाल भोसले, तारकळस शहराध्यक्ष लक्ष्मण भोसले,जिंतूर तालुकाध्यक्ष दिनकर चौधरी आदींच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीस परभणी जिल्ह्यातून जवळपास 45 ते 50 युवक उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विनोदअण्णा भोसले, सूत्रसंचालन ह भ प सखाराम महाराज रनेर तर आभाप्रदर्शन गंगाधर यादव यांनी मानले.

error: Content is protected !!