डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त ताथवडे अभियान

0 184

परभणी,दि 03 ः
आज दिनांक 02 ऑक्टोबर 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत आमच्या डॉ डी वाय पाटील युनिटेक कला वाणिज्य व महाविद्यालय, ताथवडे येथे रा. से. यो. विभागाच्या वतीने प्लास्टिक मुक्त ताथवडे हे अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ताथवडे गावात फिरून संपूर्ण प्लॅस्टिक गोळा केले व ताथवडे परिसर स्वच्छ करून महात्मा गांधी जयंतीनिमित्त एक वेगळी आदरांजली वाहिली.
या अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद पाटील, प्रा. शरद जगताप, प्रा. देवेंद्र देसाई, प्रा. राजेश पाटील, प्रा. दिलीप आहिरे, प्रा. गुडडी शेख, प्रा. अनघा घोटकर, प्रा. आरती गुंजाळ व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. रविकांत शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मानीय अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील व सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

error: Content is protected !!