डॉ. हनुमंत शिंदे यांना पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता

0 141

पुणे, प्रतिनिधी – भोसरी येथिल भगवान महावीर शिक्षण संस्थेच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. डॉ. हनुमंत पोपट शिंदे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अर्थशास्त्र विषयाचे पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली.

 

डॉ. शिंदे हे पंधरा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असून एक अभ्यासू, प्रामाणिक, शिस्तप्रिय, वक्तशिर, मेहनती, कार्यकुशल व विद्यार्थीप्रिय हाडाचा शिक्षक म्हणून ते सुपरिचित आहेत. डॉ. शिंदे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत शिक्षण घेतले असून त्यांनी २००३ मध्ये एम.ए. अर्थशास्त्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांक प्राप्त केला. यांसाठी त्यांना तत्कालीन कुलगुरू डॉ. अशोक कोळसकर व डॉ. किरण मुजुमदार (शॉ) यांच्या हस्ते ‘श्री यशवंतराव चव्हाण स्मृती सुवर्णपदक’ व ‘इंदिराबाई कुलकर्णी गोल्ड मेडल’ प्रदान करून सन्मानित केले गेले.

 

 

२००८ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम. फिल. पदवी प्राप्त करून विद्यापीठ पातळीवरील संशोधन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केले. ९ ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘क्रिटिकल स्टडी ऑफ होर्टिकल्चर डेवेलपमेंट प्रोग्राम अंडर एम्प्लॉयमेंट गरेन्टी स्कीम ऑफ महाराष्ट्रा इन पुणे डिस्ट्रीक्ट 2001-02 टू 2009-10’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. मे २०१६ मध्ये डॉ. शिंदे हे सेट परीक्षा पास झाले. याशिवाय त्यांनी ५० पेक्षा अधिक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदा, संमेलने, चर्चासत्रे यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन पत्रिकांमधून त्यांचे ४० शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थी कल्याण अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले असून यांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, समाजिक प्रश्नांसंदर्भात जनजागृती, पर्यावरण संवर्धन, वाचनसंस्क्रुतिचा विकास यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रतही जोपासले आहे. प्रत्येक शिक्षकाने ज्ञानाधिष्टीत अशा सुसंस्कृत व जबाबदार नागरिकांच्या जडणघडणीत स्वतःला समर्पित केले पाहिजे असे ते सांगतात.

 

 

डॉ. शिंदे यांच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉ. भागचंद खुरुद व प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांचे विशेष योगदान आहे. शिंदे यांना पीएच. डी. मार्गदर्शक म्हणुन मान्यता मिळाल्याबद्दल भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पागारीया, प्राचार्य सदाशिव कांबळे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी काळे, व्यवसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. जी. रसाळ, बँकिंग अँड फाइनान्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. भास्कर जंगले, प्राचार्य डॉ. सुभाष पाटील, प्राचार्य डॉ. शिवाजी ढगे, प्रा. डॉ. सुहास आव्हाड, प्रा. डॉ. अरविंद शेलार, प्रा. डॉ. आदिनाथ मोरे, प्रा. डॉ. हर्ष गायकवाड, प्रा. डॉ. ज्योतीराम म
मोरे, प्रा. दीपक पावडे, प्रा. प्रवीण म्हस्के यांच्याबरोबरच विविध विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध अर्थतज्ञ, प्राध्यापक, प्राचार्य, हितचिंतक यांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!