तुका म्हणे : भाग ९ : जीव होतो कासावीस

0 40

पहिल्या लॉकडाऊन चा काळ होता, जुन्या मालिकांची पर्वणीच चालू होती. मी व माझा शिक्षक मित्र महाभारत मालिका पाहत होतो. अर्जुन व श्रीकृष्ण या दोघांमधील संवाद रणभूमीच्या मधोमध चालू होता. अर्जुन भगवान श्रीकृष्णांस म्हणतो,

सिदन्ती मम गात्रणी, मुखं च परिशूश्यती !
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते !!
मी व माझा मित्र या संवादाविषयी चर्चा करू लागलो . अर्जुन भगवान श्रीकृष्णास म्हणत आहेत, हे कृष्णा , माझे शरीर गलितगात्र होत आहे, माझे तोंड कोरडे पडत आहे, माझे सर्व शरीर कंप पावत आहे व रोम उभे राहत आहेत, माझ्या हातातील धनुष्य गळून पडेल असे होत आहे. खूप विचारामुळे अर्जुनास ही चींतारोगाची लक्षणे जाणवत आहेत. माझा मित्र मला म्हणाला, ह्याचा मराठीत अर्थ तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात

तुका म्हणे
” काय करू जीव होतो कासावीस ! कोंडीले दिस गमेचीना !!१!!
पडीले हे दिसे ब्रम्हाडची वोस ! दाटोनी उच्छावास राहातसे !!२!!
तुका म्हणे अगा सर्वजाणंतिया ! विश्र्वभरे काया निववावी !!३!! ”

तुकोबाराय म्हणतात, देवा मी आता काय करू मला फारच कासावीस झाल्यासारखे होत आहे . मला कोंडल्यासारखे होत आहे आणि दिवस तर जाईन असे झाले आहे . सर्व ब्रह्मांड ओस पडल्यासारखे दिसत आहे आणि माझा दम कोंडल्यासरखा दिसत आहे . तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरा तू सर्व जाणता आहेस त्यामुळे तू ये मला भेट दे आणि माझ्या शरीराला शांत कर.

कासावीस होणे , बैचेन वाटणे, धडधड होणे , दम कोंडल्यासारखे होणे ही सर्व लक्षणे हाडसून खडसुण पाहिल्यावर समजते , ही तर चिंता म्हणजेच अन्झायटी ची लक्षणे. तसे पाहिले तर अंझायटी हा एक सुरक्षिततेचा प्रतिक्रिया. पण ज्यावेळी चिंता ही आपल्या आवक्या बाहेर जाते , त्यावेळी त्यास चींतारोग (अंझायटी डीसऑर्डर ) म्हणतात

चींतारोग / अंझायटी डीसऑर्डर लक्षणे :
एखादा विचार मनात घर करून बसणे व त्याचे परिणाम शरीरावर जाणवणे म्हणजे चिंतारोग म्हणुया.
१) धडधड होणे , छातीत दुखल्यासारखे – दाबल्यासारखे वाटणे
२) घाम येणे
३) श्वास घेण्यास त्रास होणे, दम अडकणे
४) घसा कोरडा पडणे
५) पोटात कालवाकालव होणे
६) चक्कर येणे , डोकं जड पडणे
७) अंगात मुंग्या येणे , थरथरी सुटणे
८) आपण मरणार अशी भीती वाटणे
९) आपणास वेड लागेल , स्वत:वरील ताबा सुटेल असे वाटणे
१०) कामावर, सामजिक जीवनावर परिणाम होणे

चींतारोगाची कारणे :
१) मानसिक कारणे : आजच्या धकाधकीच्या जीवनातील वाढता ताण तणाव हे चींतारोगाचे प्रमुख कारण होय . कोरोणा कालखंडामध्ये झालेले आर्थिक-सामाजिक व शारीरिक ताणतणावातून चिंतारोगाचे प्रमाणे पूर्वीच्या प्रमाणापेक्षा २०-२५ टक्क्यांनी अधिक झाल्याचे आढळून येत आहे.
२) बायलॉजीकल कारणे : मेंदूतील ऑटोनोमास नर्व्हस सिस्टम च्या अती उत्तेजनामुळे चिंतारोगाची शारीरिक लक्षणे येतात. चींतारोग , पॅनिक अटॅक हे मेंदूतील अमिग्डाला या भागातील कार्य बिघडल्यामुळे होऊ शकतात. तसेच एखाद्या पॅनिक अटॅक नंतर आपणास दुसरा आणखी अटॅक येऊ शकतो ही भीती हिप्पोकॅम्पस या मेंदूतील भागांमधल्या बिघाडामुळे होऊ शकते.
३) रासायनिक कारणे : मेंदूतील काही रासायनिक बदलांमुळे जसे सिरोटोनिन नावाचे न्यूरोट्रान्समीटर चे प्रमाण कमी झाल्यामुळे चिंता रोग किंवा पॅनिक अटॅक होऊ शकतात.

उपचार पद्धती :
१) समुपदेशन : अर्जुनास बैचैनी होत आहे याची जाणीव होताच श्रीकृष्णाने अठरा अध्यायामध्ये जो सल्ला दिला व भगवदगीता तयार झाली ते समुपदेशनच होय. श्रीकृष्णाने विवेकाने अर्जुनास विचार करण्यास सांगितले ते असे “आपण विचार करावा, आपण अस्वस्थ होतो ते आपल्या विचारामुळे आणि शांत ही होतो आपल्या विचारामुळेच. मग आपण असे विचार निवडावे जे आपणास अडचणीतून पुढे जायला मदत करतील आणि एखादा रस्ता दाखवतील”.
समुपदेशन प्रमाणे रेलाझेशन थेरपी, कॉग्निटिव बिहेविअरल थेरपी ई. उपचारपद्धती ही चिंता नियंत्रणात आणण्यास उपयोगी पडतात. यामध्ये रुग्णांस त्याच्या शारीरिक लक्षणे , विचार आणि भावनिक दुष्टचक्र याविषयी जागृत केल्या जाते व रुग्णांची कॉग्निटिव रीस्ट्रकचरिंग हे तंत्र शिकवले जाते ज्यामध्ये नकारात्मक विचारांचे नियमन करण्याचे शिकवले जाते.

२) औषधोपचार : चिंतारोग / अंझायटी डीसऑर्डर या आजारामध्ये सिरोटोनीन नावाचे रसायन वाढवणाऱ्या औषधी जसे सिलेक्टीव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर व बैचैनी कमी करण्यासाठी अँटी अंझायटी औषधांचा वापर उपयोग केला जातो. औषधींचा उपयोग चालू केल्यानंतर हळूहळू लक्षणे कमी व्हायला लागतात. अचानक औषधी बंद केल्यास लक्षणे परत येण…
[7:51 pm, 14/11/2021] Dr. Jagdish Naik: भाग ९ : जीव होतो कासावीस

हा भाग प्रिंट नाही झाला दिवाळी सुट्टीमुळे
[7:51 pm, 14/11/2021] Dr. Jagdish Naik: तुका म्हणे : भाग ८ : अंधश्रद्धा

एका खेड्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेला बाबांच्या दर्शनासाठी २-३ किमी ची रांग लागली होती. मी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. खाली उतरून चौकशी केल्यास कळाले , एका जटा वाढवलेल्या बाबाच्या अंगात दैविशक्ती येते , तो साखरेचा प्रसाद देतो व कोणताही असाध्य आजार , कॅन्सर सुद्धा नीट होतो . काही दिवसांनी त्यास भोंदूगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक झाल्याचे कळाले. मी त्याविषयी एका गुरुजी बरोबर चर्चा करत असताना ते म्हणाले तुकाराम महाराजांनी या विषयी खूप जनजागृती केली आहे , जसे तुकाराम महाराज म्हणतात

तुका म्हणे
डोई वढवूनी केश ! भूते अंती अंगास !!१!!
तरी ते नव्हती संतजन ! तेथें नाहीं आत्मखूण !!२!!
मेळवुनी नरनारी ! शकून सांगती नानापरी !!३!!
तुका म्हणे मैंद ! नाही त्यापासी गोविंद !!४!!

म्हणजे डोक्याचे केस वाढवून जे अंगात भूते आणतात ते संत, साधू नसतात , त्यांच्यापाशी सज्जनांचे कोणतंही लक्षण नसते . स्त्री पुरुष जमवून नानाप्रकारे सकुन सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात , ते मैंद म्हणजे निर्बुद्ध आहेत , त्यांच्यापाशी गोविंद नाही.

तुकाराम महाराजांनी त्या काळी अंध:श्रद्धा या विषयी खूप जनजागृती केली. तरी सुद्धा अंध:श्रद्धा वाढतच गेली.

अंधश्रध्देची मुळ कारणे :

आजच्या आधुनिक काळात सुद्धा खेड्यापाड्यात आणि शहरात सुद्धा अश्या प्रकारच्या ढोंगी साधू, महाराजाचे वास्तव्य आहे आणि हे आपल्या भोंदूगिरीने समाजातील कमकुवत मानसिकता असणाऱ्या भोळ्या भाबड्या जनतेला लुटत आहेत. ज्या गोष्टी विषयी गूढ वलय आहे अश्याच बाबतीत हे भोंदू बाबा उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असतात ..

१) मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्ती :
एखाद्या व्यकीस मानसिक आजार झाल्यास आजही सुशिक्षित असो व अशिक्षित , त्या मनोरुग्णास नातेवाईक बाबा-बुवांना दाखवतात. गंडा- दोरी करून हा करणीचा प्रकार आहे असे ते भासवतात मग रुग्णाच्या चालू होतात वाऱ्या.
२) भीती : कोणतीही वाईट गोष्ट झाली की ती दैवी कोपामुळे झाली असा अनेक शतकापासून चालत आलेला प्रघात तो आजही २१ व्या शतकात पाळला जातो. याच दैवी कोपाच्या भीतीचे भांडवल हे बाबा बुवां करतात व आपण अंधश्रद्धेचे बळी बनतो.
३) सामाजिक मानसिकता : अनेक लोक एखादी गोष्ट करतात म्हणजे ती बरोबरच असेल असे मानून आपण त्यांच्याप्रमाणे वागतो . त्यातूनच तयार होते मॉब सायकॉलॉजी. अश्या बातम्या वाऱ्या सारख्या पसरतात. या मानसिकतेचा फायदा घेऊन तयार होतात अनेक भोंदू बाबा जसे आताचे उदाहरण म्हणजे बाळू मामाचा अवतार म्हणवणारे मनोहर भोसले हा व्यक्ती. त्यात भर म्हणजे अश्या भोंदूना गावातील अनेक व्यक्ती अजाणतेपणी किंवा जाणीवपूर्वक , अर्थकारणासाठी , राजकारणासाठी मदत करताना सऱ्हास दिसतात.
४) आरोग्यविषयक गैरसमजुती : असाध्य आजार हॉस्पिटलमध्ये नीट होत नाहीत असे जाणवल्यास कॅन्सर सारखे आजार चुटकीसरशी नीट करणारे , असंतान जोडप्यांना बाळ देणारे बाबा तयार होतात . त्याचेच उदाहरण म्हणजे साखर बाबा, फरशी बाबा ई. आपण कोणताही आजार नीट करू शकतो असे भासवून गरीब जनतेची लूट केल्या जाते.
५) सामाजिक परंपरा : एखाद्या मंदिरात किंवा दर्ग्यात गेल्यावर अंगात येणे म्हणजे दैवी प्रकार असा अनेक शतकापासून चालत आलेली परंपरा. वैज्ञानिक संशोधनानुसार हा एक मानसिकतेचा भाग (कल्चर बाऊंड सिंड्रोम )परंतु आपण अंधश्रद्धेला बळी पडतो. नवीन लग्न झालेल्या तरुणीला मनातील तान वाढत असेल तर त्याचे परिवर्तन अंगात येणे, दातखिळी बसणे ई प्रकारात होऊ शकते. याचे प्रमुख कारण ताणतणाव होय. जसे कुक्कर ची शिट्टी बंद झाल्यास वाफ बाहेर न पडू शकल्याने त्याचा विस्पोट होईल तसेच मनातील तान बाहेर न पडल्यास अंगात येणे, दातखिळी बसणे असे लक्षणे येऊ शकतात. याबाबत चित्रित झालेला सुंदर सिनेमा म्हणजे भूलभुलैया.

तुकोबाराय पुढे सांगतात , हे भोंदू बाबा आपल्या मानसिकतेचा गैरफायदा कसा घेतात. ते म्हणतात

“ऐसे कैसे झाले भोंदू ! कर्म करोनी म्हणती साधू !!१!!
अंगा लावूनिया राख ! डोळे झांकुनी करिती पाप !!२!!
दावूनी वैराग्याची कळा ! भोगी विषयाचा सोहळा !!३!!
तुका म्हणे सांगो किती ! जळो विषयाचा संगती !!४!!”

अशा प्रकारचे अनेक भोंदूबाबा संपूर्ण भारतात होऊन गेले आहेत व नवनवीन तयारही होत आहेत. जसे पंजाब मधील गुरमीत रामरहीम बाबा महिलांवरील अत्याचाराच्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये आहेत. प्रसिद्ध संत म्हणवणारे आसाराम बापू हे सुद्धा महिलांवरील अत्याचार आणि खून प्रकरणांमध्ये जेलमध्ये आहेत.
जमशेदपूर मधील पैशांचा पाऊस पाडणारा बाबा जो भक्तांकडून पैसे घेऊन पैशाचा पाऊस पाडून दुप्पट करून देतो अशी भाबडी असा दाखवायचा. अलीकडच्या काळात अटक करण्यात आलेला नागपुर मधील नागराज बाबा जो कोरोणा रुग्णांना नागाच्या प्रकारचा आवाज काढून बरे करण्याचे नाटक करायचा. अशा प्रकारचे असंख्य भोंदूबाबा समाजामध्ये आपले प्रस्थ मांडून आहेत,
तुकोबाराय म्हणूनच म्हणतात , जगात असे कसे भोंदू झाले आहेत जे कुकर्म करतात आणि स्वतः साधू म्हणतात. अंगाला राख लावतात , डोळे झाकून ढोंग करतात आणि अनेक प्रकारचे पाप करत असतात. आपल्या अंगी वैराग्य आल्याचे लोकांना दाखवतात परंतु कोणालाही कळू न देता विषयसुखाचा सोहळा हे भोगतात. तुकोबाराय म्हणतात, अश्या भोंदू लोकांच्या कुकर्माची गोष्ट तर मी किती सांगू, असल्याची संगतीही नको व त्यांच्या संगतीला आग लागो.

अंधश्रद्धा कशी रोखता येईल :

१) विवेकी दृष्टीकोण : एखाद्या बाबतीत हडसून- खडसून विचार केल्यास, सखोल माहिती मिळवल्यास आपला दृष्टिकोन विवेकी बनतो. एखादी प्रसिद्ध व्यक्ती किंवा अनेक लोक करतात म्हणून आपणही करतो , अश्या गोष्टी करणे टाळावे.
२) जादूटोणा प्रतिबंधक कायदा : आपल्या आजुबाजूस एखादा अघोरी अंधश्रद्धेचा प्रकार घडत असल्यास तात्काळ प्रशासनास कळवणे एक सजग नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी असावी. ज्या गोष्टीसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी संपूर्ण आयुष्यभर काम करून आपले बलिदान दिले . अश्या कामाचा एक धागा बनण्याचा प्रयत्न आपण अवश्य करू शकतो.
३) सामजिक प्रबोधन : तुकाराम महाराजांनी वेळोवेळी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली आहे. आजही अनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिति) हे काम सातत्याने करत आहे , परंतु खूपच कमी लोक ह्यात सहभागी होताना दिसतात.
४) वैज्ञानिक दृष्टीकोण : एखादा व्यक्ती आजारी पडल्यास किंवा मनोविकार झाल्यास , त्याला बाबा बुवांना दाखवून त्याला आवश्यक ट्रीटेंटसाठी उशीर होतो व आजार आणखीनच बळावतो. एखाद्या स्त्रीस मूलबाळ होत नसल्यास , एखाद्या जाणत्यास दाखवतात. तुकोबरायांनी म्हणूनच म्हटले आहे ,” नवशे कन्यापुत्र होती ! तरी का करणे लागे पती !!” नवस, सकुन यात अडकण्यात काही अर्थ नसतो.
५) सामाजिक लसीकरण : डॉ. हमीद दाभोलकर यांच्या म्हणणयाप्रमाणे एखाद्या व्यक्तीने किंवा सरकारने नियम बनवून अंधश्रद्धा निर्मुलन होणार नाही. त्यासाठी आवश्यकता आहे , अंधश्रध्देविरूद्ध सामाजिक लसीकरणाची..

डॉ. जगदिश ज्ञा. नाईक
मानसोपचरतज्ज्ञ

error: Content is protected !!