आ.डॉ.राहूल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी

0 16

परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः
जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे़ या अतिवृष्टीचा परभणी विधानसभा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे़ अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ.राहूल पाटील यांनी तहसीलदार, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह शुक्रवार, दि.१२ ऑगस्ट रोजी परभणी विधानसभा मतदार संघातील दुर्डी, मांगणगाव आणि धार या अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देवून पिकांची पाहणी केली या भेटीत सोयाबीन, मूग, कापूस या पिकांवर अतिवृष्टीमुळे रोगांचा तसेच गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे़ यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे़ या पार्श्वभुमीवर मतदार संघातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले तसेच या संदर्भात शासनाकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ.राहूल पाटील यांनी शेतकऱ्यांना देत दिलासा दिला आहे़
यावर्षी पावसाळ्यास सुरूवात झाल्यानंतर जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही परंतू जुलै महिन्यांत संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यासह परभणी विधानसभा मतदार संघातील ओढे, नाले, नद्यांना पूर आला होता येलदरी व लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या भागतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्यामुळे या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडावे लागले होते त्यामुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला या भरीसभर म्हणजे जुलै महिन्यात शेवटच्या टप्प्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवाती पासुनच पुन्हा जोरदार हजेरी लावली सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे़ त्यामुळे सोयाबीन, कापूस, मुग आदी पिके पिवळी पडत आहेत़ तर अनेक ठिकाणी सोयाबीनची वाढ खुंटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर यामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे़
परभणी मतदार संघाला देखील जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ या पार्श्वभुमीवर आ.डॉ.राहूल पाटील यांनी मतदार संघातील दुर्डी, मांगणगाव आणि धार या गावांना शुक्रवारी भेट देवून पिकांची पाहणी केली़ या संदर्भात प्रशासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करावेत अशा सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या़ तसेच शासनाकडून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले या पीक पाहणी दौऱ्यात आमदार डॉ.पाटील यांच्यासोबत तहसीलदार बिराजदार, तालुका कृषी अधिकारी कच्छवे, दिनेश बोबडे, अरविंद देशमुख, संदीप झाडे, शिवाजीराव चोपडे, बाबुराव चोपडे, रामकिशन मुळे, रमेश चोपडे, दामोधर सानप, आश्रोबा आळसे, प्रभाकर चोपडे, पंढरी खोडवे आदीसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!