डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन

0 41

परभणी,दि 12 ः
शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला होणे अपेक्षित आहे. परंतु माहे फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आयकराची प्रकरणे यामुळे मार्च महिन्याचे वेतन उशिरा मिळते हे अपेक्षित असते. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील लेखा शाखेमार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे भान ठेवून १२ एप्रिल रोजीच सर्व कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले आहे. जयंतीनिमित्त खरेदी तसेच इतर खरेदी साठी लवकरात लवकर वेतन मिळावे या दृष्टिकोनातून लेखा विभागामार्फत वरिष्ठ लेखाधिकारी मधुकर नाईक, कनिष्ठ लेखाधिकारी नितीन यादव, कनिष्ठ सहाय्यक रमाकांत सोगे तसेच आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील यांच्यासोबत जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साळवे तसेच सचिव कैलास सोमवंशी यांनी वारंवार पाठपुरावा व चर्चा केल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे १४ एप्रिल पूर्वी वेतन मिळाले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त होत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांचे विशेष आभार मानत आहेत.

error: Content is protected !!