संत ज्ञानेश्वर वॉर्डातील पाणी टंचाई दूर करा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलनाचा इशारा

0 63

 

हिंगणघाट,दि 23 (प्रतिनिधी)ः
येथील संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून वॉर्डातील नागरिकांचे पाण्या अभावी भयंकर त्रास होत असल्याने काल दि 19 एप्रिलला वार्डातील नागरिकांच्या वतीने नगर पालिकेचे प्रशासक व तहसीलदार हिंगणघाट व मुख्याधिकारी नगर पालिका हिंगणघाट यांना निवेदन देऊन पाण्याची समस्या तीन दिवसात न सुटल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारच्यावतीने देण्यात आलेला आहे.
प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या भागातील नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अमृत योजनेच्या नावाखाली जीवन प्राधिकरणा कडे असून मागील चार वर्षांपासून अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे.पाईप लाईन टाकून झाली.याच भागात संतोषी मातमंदिरा च्या मागील बाजूस असलेले श्री दीक्षित ते श्री वाघमारे यांच्या घरापर्यंत असलेल्या पाईपलाईन मधून मागील वीस दिवसापासून पाणी आलेले नाही.तसेच श्री भाईमारे ले-आउट मधील श्री मंडल यांच्या घरापासून ते श्री हजारे यांच्या घरा पर्यन्त नळाला पाणी येते की नाही.त्यामुळे या भागात राहणारी जनता त्रस्त झालेली आहे .वारंवार अर्जविनंती करूनही नप प्रशासन व जीवन प्राधिकरण विभागाला जाग येत नाही त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे.ही गंभीर समस्या त्वरित सोडवा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन प्रहार तीव्र आंदोलन करेल असे निवेदन नप मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदन देते वेळी प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्ण मित्र गजू कुबडे,तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,शहर प्रमुख अतुल जाधव,अजय लढी, सूरज कुबडे,सतीश गलांडे,अजय ठाकरे,अमोल रामगुंडे,किशोर देवढे,पवन वाघमारे,अमोल वाघमारे धीरज नन्द्रे, अमित गोहणे,प्रणय नांदूरकर,गोपाल दरवेकर,प्रशांत तराळे,निखिल कोल्हे,अमित गोजे व वॉर्डातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!