शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या विधवा, परितक्त्या महिलांना रोजगार उपलब्ध होणार-आमदार डॉ.राहुल पाटील

0 62

परभणी, दि 30-
आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील विधवा, परितक्त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरु केलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनतील पहिल्या टप्यातील महिलांनी शिलाई प्रशिक्षण पूर्ण केले असुन त्यांना विविध शैक्षणीक संस्थाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.अशी माहीती आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली.आमदार डॉ.पाटील यांनी या योजनेची पाहणी केली आहे.

समाजामध्ये निराधार, विधवा परितक्त्या महिलांना रोजगाराचे साधन नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. कुटुंबात कर्ता पुरुष नसल्याने अशा महिलांना शासकीय योजनांचा देखील लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात परभणी विधानसभा मतदारसंघातील पाच हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजना राबविण्यात येत आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व शहरातील कै.कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे ही योजना राबवली जात असून पहिल्या टप्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.260 महिलांनी या टप्यात प्रशिक्षण पूर्ण केले आहे.या प्रशिक्षणास आमदार डॉ.पाटील यांनी भेट दिली.
या महिलांना शहरासह बाहेर ठिकाणच्या शैक्षणीक संस्थाच्या गणवेश,व अन्य शिलाई काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे.तसेच स्थानीक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद,महानगर पालीका यांचेही गणवेशाचे काम दिले जाणार असल्याचे आमदार डॉ.पाटील यांनी सांगीतले.
या महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप केले जाणार आहे.तसेच त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार डॉ.पाटील यांनी सांगीतले.

error: Content is protected !!