पूर्णा येथे आनंद अनुभूती शिबिराची उत्साहाने सांगता

0 69

पूर्णा,दि 20  (प्रतिनिधी)  ः
दिनांक 13 सप्टेंबर पासून सुरु झालेल्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या आनंद अनुभूती शिबिराची रविवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सेवा साधना आणि सत्संगाच्या सहवासात अगदी उत्साहाने समारोप संपन्न झाला. श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाने हिंसा मुक्त समाज आणि तणावरहित मन या संकल्पनेतून आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत, वर्तमान काळात जगून निरपेक्ष पणे आनंदी राहणे हीच जीवन जगण्याची कला आहे. हीच गुरु देवाची शिकवण आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक इंजिनियर नागनाथ कापूसकरी व किरण बोराळकर यांनी शिबिरार्थीसमोर विशद केली. या शिबिरात सर्व वयोगटातील महिला व पुरुष मिळून जवळपास 16 नवीन व दहा स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शेवटच्या दिवशी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे वैद्यकीय अधिकारी श्री गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच डॉक्टर गजानन शिंदे व त्यांच्या सह सर्व सहकाऱ्यांचे शिबिरार्थी तर्फे आभार व्यक्त करण्यात आले आणि त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला. सत्संगासाठी नांदेडहून श्री नरेंद्र रत्नपारखी, डॉक्टर प्रतिमा टोम्पे ,श्री गोविंद देशमुख हे उपस्थित होते. या शिबिरासाठी श्री शरद कापसे सौ विजयाताई कापसे ज्योती आंबेकर ,प्रकाश कापसे ,सुरेश लोखंडे यांचे सहकार्य लाभले तसेच निरज आंबेकर त्रिनेत्र भालेराव, वैभव कोल्हे, अंजली गवळी, वंदना कापसे अनिताताई कुर्रे, श्री व सौ सुरेश एकलारे, जिरवणकर , लोखंडे या सर्वांचे सहकार्य लाभले पुढील शिबिर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी करण्याचे ठरले

error: Content is protected !!