गुत्तेदाराच्या चुकीमुळे झरी गावात प्रवेश बंदी

0 57

अनिल जोशी
झरी,दि 14 ः
परभणी शहर महानगरपालिकेच्या येलदरी ते परभणी सुरु असलेल्या जलवाहीनीच्या कामासाठी ऐन रस्तयात खड्डा खोदुन ठेवल्याने झरी गावात ये-जा बंद झाली आहे.रविवारी बाजार असल्याने दुसरा रस्ताही बंद होता.त्यामुळे नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दर रविवारी झरी येथील बाजार भरतो. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत कडून येणाऱ्या रस्त्याला बाजार भरत असल्यामुळे गावात येणाऱ्या वाहनावर बंदी असते.तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या चुकीमुळे जिंतूर परभणी रोड कडील शॉपिंग सेंटर समोरून भला मोठा खड्डा केल्यामुळे गावात प्रवेश बंदी झाली त्यामुळे गावातील येणारे-जाणारे वाहतुकीवर बंदी तर झालीच परंतु गावात येईन येणाऱ्या व जाणाऱ्या रुग्णांना ही अतिशय त्रास सहन करावा लागला. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी झरी अकरा के.व्ही वरील विद्युत पुरवठा सकाळी दहा वाजल्यापासून बंद केल्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले आहेत. एसटी महामंडळ बंद असल्यामुळे खाजगी वाहनाकडे लोकांचा कल वाढला आ.हे त्यामुळे अनेक प्रवाशांना आपल्या जाणा-यांना बंद असल्यामुळे आपला प्रवास थांबवावा लागला तसेच गावातील रुग्णाला परभणीला जाण्यासाठी बसस्थानक परिसरात  कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव पायी पायी यावे लागले. महानगरपालिकेच्या अक्षम्य चुकीमुळे  रास्तारोको स्थिती निर्माण झाली होती. याबाबत झरी ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे सदरील काम हे संध्याकाळी करायचे शासनाचा आदेश असतानाही गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे व नियोजनशून्य कारभारामुळे सामान्य जनतेची मात्र यात मोठी परेशानी झाली आहे हे विशेष याबाबत आले गुत्तेदार च्या मना तेथे कोणाचे काही चालेना या म्हणीप्रमाणे गुत्तेदार चे मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

सदरील कामामध्ये एक पोल झुकून खाली पडल्यामुळे झरी परिसरातील आठ तास वीजपुरवठा खंडित झाला होता त्यामुळे सामान्य जनतेचे हाल वेगळे झाले याच संबंधित अधिकाऱ्यास संबंधित विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने समज देऊन काम रात्रीच्या वेळेस करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

error: Content is protected !!