कोरोना रुग्णांत वाढ : ‘या’ राज्यात पुन्हा मास्क सक्ती
बंगळुरू : कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने, कर्नाटक सरकारने शुक्रवारी राज्यात कोविड निर्बंध लादले आणि तत्काळ प्रभावाने सामान्य लोकांना मास्क घालणे अनिवार्य केले. आरोग्य आयुक्तांनी शुक्रवारी हा आदेश जारी करून सर्व सार्वजनिक ठिकाणे, बसेस, खासगी वाहने, मॉल्स, शैक्षणिक संस्थांमध्ये मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये एका दिवसात 525 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंताजन बाब म्हणजे यातील तब्बल 494 रुग्ण एकट्या बंगळुरू शहरातील आहे. या विषाणूमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी, येथे कोरोनाबाधित रुग्णांचा सक्रीय दर 2.31 टक्क्यांवर पोहचला आहे.
माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कर्नाटकात 228 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या कर्नाटक राज्यात कोरोनाचे 3 हजार 177 इतके सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी, बेंगळुरूमधील 3 हजार 061 रुग्ण आहेत. दरम्यान, बंगळुरू शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्ण आढळून येत असल्याने सरकारने पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्ती केली आहे.