अखेर लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात

0 170

 

निफाड,दि 28 (प्रतिनिधी)ः
लासलगाव सह १६ गाव पाणी प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या दालनात काल दिनांक २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत नवीन योजना कार्यान्वित होईपर्यंत १६ गावच्या पाइप लाईन दुरुस्तीसाठी १५ वित्त आयोगाच्या बंधित निधीतून खर्च करण्यात यावा अशी सूचना केली. निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी या योजनेच्या दुरुस्ती साठी लासलगाव २५ लाख,विंचूर २० लाख रुपये,टाकळी १०लाख रुपये,पिंपळगाव नजिक १० लाख रुपये या निधीतून खर्च करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सदर कामास स्वतः उभे राहुन अधिकारी वर्गाने युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली. याप्रसंगी विस्तार अधिकारी एस के सोनवणे हे प्रत्यक्ष रित्या सुरू असलेल्या कामावर उभे राहुन काम करून घेण्यास सुरुवात केली. याप्रसंगी लासलगाव ग्राम पालिकेचे सदस्य रोहीत(दत्ता) पाटील व अमोल थोरे यांनी लासलगाव वासियांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेल? यासाठी पाहणी केली यावेळी ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते. तसेच टाकळी, पिंपळगाव नजिक,निमगाव या गावांचे कर्मचारी होते .दोन ते तीन दिवस हे काम सुरू राहणार आहे तरी हे काम लवकरात लवकर कसे सुरळीत होईल व लासलगाव सह इतर गावांना पाणी पुरवठा कसा लवकर करता येईल ? यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी एस के सोनवणे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांच्या देखरेखेखाली काम सुरू आहे.

error: Content is protected !!