फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची -कंपनी सचिव परेश देशपांडे

0 82

परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः ऑनलाईन आर्थिक व्यवहार आपल्या दैनदिन जगण्यातला अविभाज्य घटक बनला आहे. ऑनलाईन पध्द्तीने होणाऱ्या आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असल्याचे मत भारतीय कंपनी सचिव संस्थानचे नोडल अधिकारी परेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी महाविद्यालयात बुधवार (दि.२९) रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित आर्थिक साक्षरता कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत दिनेश लोहाडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे,प्रबंधक विजय मोरे, महोत्सव समन्वयक डॉ.जयंत बोबडे, सदस्य डॉ.एम.एस. परतुरकर, प्रा.डी.जी.गवळी आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.देशपांडे पुढे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील विद्यार्थीमध्ये प्रचंड क्षमता आहेत, ह्या क्षमता ओळखून घेत आपल्यात मृदू कौशल्य विकसित करून ध्येय निश्चित केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कंपनी सचिव कोर्स तसेच वाणिज्य क्षेत्रात उपलब्ध संधीविषयी विस्ताराने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, आज आपण भारतीय कंपनी सचिव संस्थान दिल्ली यांच्याशी करार करत आहोत. यामुळे परभणीतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव होण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, परीक्षा आदींची सोय उपलब्ध होणार आहे. या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर भारतीय कंपनी सचिव संस्थान आणि श्री शिवाजी महाविद्यालयात परीक्षा, अभ्यासक्रम, अध्यापन याविषयी द्विपक्षीय करार झाला.
सदरील कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.जयंत बोबडे यांनी आजादी का अमृत महोत्सवाची भूमिका विशद करत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.रहमान शेख तर आभार प्रा.डी. जी.गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गणेश चालींदरवार, डॉ.दिगंबर रोडे, डॉ.रुपेश देशमुख, डॉ.प्रवीण धापसे, प्रा.शेख, प्रा.गोपाळ परांडे, एकनाथ देवकर, सय्यद सादिक, दत्तराव वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.

 

error: Content is protected !!