बॉडी वेल इनर अँड आऊटरचे पहिले दालन पुण्यात,बॉडिवेल’ ब्रँडचे लोकार्पण

0 61

 

पुणे/पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी – बॉडीवेल इनर अँड आऊटर प्रायव्हेट लिमिटेड च्या पहिल्या दालनाचे तसेच ‘बॉडिवेल’ या ब्रॅंडचे पुण्यातील पिंपळे गुरव येथे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यासाठी बॉडी वेल इनर अँड आऊटर प्रायव्हेट लिमिटेडच्या पहिल्या आउटलेट चे संचालक गोरख वहिल, संचालिका स्वाती वहिल, दैनिक शब्दराज चे कार्यकारी संपादक विशाल मुंदडा आयटमगिरी व खिचिक फेम अभिनेते शशी ठोसर, परफ्युम, गुड मॉर्निंग फेम साहिल कुमार, माय बापा विठ्ठला, रघु 350, रुद्रा, आतुर इ. च्या सहायक दिग्दर्शिका संगीता तिवारी तिरसाट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री तेजस्विनी शिर्के, तिरसाट चित्रपटाचा मुख्य अभिनेता नीरज पवार, लगन चित्रपटाचा मुख्य अभिनेता सुजित चौरे, पुढचं पाऊल चित्रपटातील अभिनेत्री आशु सुरकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरुष व स्त्रियांच्या अंतर्वस्त्राच्या पहिल्या दालनाचे लोकार्पण व भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संचालक स्वाती व गोरख वहील यांनी सर्व ब्रॅण्डस वर ग्राहकांना फक्त 75 % टक्के रक्कम भरून 25% पर्यंत कॅशबॅक देण्याची घोषणा यावेळी केली. हे दालन मल्टीब्रँड स्टोर असून ही सूट बॉडिवेल, जॉकी, व्हॅनहुसेन, डिक्सि, मायक्रोमॅनसह इतरही सर्व दिगग्ज ब्रँड्सवर दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक खरेदीवर देण्यात येणार आहे. ग्राहकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांच्यावतीने करण्यात आले. तसेच येत्या सहा महिन्यात बॉडिवेलचे स्वतःचे उत्पादन युनिट सुरू करून त्यामार्फत होजीअरी मध्ये 50 हुन अधिक दर्जेदार उत्पादनांची रेंज बाजारात आणणार असल्याचा मनोदय संचालकांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी एलइडी स्क्रीनवर उपस्थित कलाकारांच्या म्युझिक अल्बम, चित्रपटातील गाणी, ट्रेलर, तसेच चित्रपटातील काही दृश्य दाखविण्यात आली. याप्रसंगी भर पावसातही आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी उसळली होती. सर्व कलाकारांनी बॉडी वेल इनर अँड आऊटर या दालनाच्या शुभारंभ सोहळ्यात संचालक स्वाती व गोरख वहील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या दालनाच्या लवकरात लवकर शंभर शाखा व्हाव्यात व आपण आम्हालाच प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला बोलवालं अशीे अपेक्षा असल्याची इच्छा तिरसाट ची अभिनेत्री तेजस्विनी शिर्के यांनी बोलून दाखवली.

या कार्यक्रमानंतर निमंत्रित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी परिसरातील राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक,नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत. या सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी, तर उपस्थितांचे आभार स्वाती वहिल यांनी मानले.

माध्यम समन्वयक – विशाल मुंदडा
संपर्क – 9404075557

error: Content is protected !!