दीडशे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
सेलूतील पांडुरंग हाॅस्पिटलचा चाळीस वर्षांपासूनचा उपक्रम
सेलू / नारायण पाटील – येथील पांडुरंग हाॅस्पिटलच्या वतीने सातोना बु. येथील बालानंदस्वामी मंदिरात रविवार २४ मार्च रोजी केहाळहून पैठणला पायी जाणाऱ्या दिंडीतील दिडशे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
कट्टर वैष्णव कै. नथुराम महाराज केहाळकर यांनी गेल्या चाळीस वर्षापुर्वी जिंतूर तालुक्यातील केहाळ येथून तिर्थक्षेत्र पैठन अशी पायी दिंडी सुरू केली. तेव्हापासून सेलू येथील पांडुरंग हाॅस्पिटलचे संचालक डाॅ अरविंद बोराडे हे दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून सर्व आजारावर औषधोपचार देत असतात. नथुराम बाबा केहाळकर त्यांचे निधनानंतर गेल्या दहा वर्षापासून रमेश महाराज तुरे हे दिंडीचा वारसा चालवत आहेत. दिंडीमध्ये दीनशे ते तिनशे वारकरी सहभागी असतात.
दरम्यान डाॅ अरविंद बोराडे, डाॅ अंबादास टाले, डाॅ योगेश बोराडे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. याकामी सुधीर बिडवे, लक्ष्मण घोडके, ऋतूराज शिंदे यांनी सहकार्य केले. यावेळी भारत महाराज पांचाळ यांचे नामसंकिर्तन झाले.