वाघाळा येथे जनावरांचे मोफत लसीकरण-सरपंच बंटी पाटील यांचा पुढाकार

0 36

रमेश बिजुले
पाथरी,दि 16 ः
सद्यस्थितीत संपुर्ण देशासह राज्यभरात लंपी या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. आजार होऊन उपचार करण्या पेक्षा तो येण्या आगोदरच प्रतिबंध केल्यास पुढील परिणाम दिसुन येणार नाहित आणि गावातील शेतकरी,कष्टक-यांचे जित्राब सुरक्षित राहिल या साठी वाघाळा गावचे युवा सरपंच बंटी पाटील यांनी १७ सप्टेबर मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधत गावातील संपुर्ण जनावरांना मोफत लसीकरण करण्याचा निर्धार करून वाघाळा गावातील ज्या शेतकरी,कष्टकरी यांच्या कडे असलेल्या संपुर्ण जनावरांना शासकीय पशुवैद्यकीय दवाखाण्यात आणून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

लंपी सदृष्य संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे.हा आजार जनावरांना होत असल्याने यात लाखमोलाचे जनावर दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.या आजरात जनावरांना प्रचंड ताप,डोळ्यातून, नाकातून पाण्याचा प्रचंड स्राव, भुकमंदावने,दुधात घट,पायावर सुज,चालण्यात लंगडेपणा,अंगावर गाठी येणे अशी लक्षणे दिसतात अनेक वेळा औषधोपचारा साठी महागडा खर्च करून ही जनावरे दगावली जात आहेत. या मुळे कुनब्याचे नभरुन येणारे नुकसान होत अाहे. या रोगाचा फैलाव ही प्रचंड वेगाने होत असल्याने या रोगाला प्रतिबंध घालण्या साठी रोगा पुर्वी लस हा एकमेव उपाय असल्याचे तज्ञ सांगतात. त्या मुळे माझ्या घावातील एकाही जनावराला लंपी या आजाराने ग्रासुनये या साठी वाघाळा गावचे धडाडीचे युवा सरपंच बंटी पाटील यांनी १७ सप्टेबर मराठवाडा मुक्तीदिनाच्या निमित्ताने वाघाळा येथील पशवैद्यकीय दवाखाण्यात गावातील सर्व जनावरांना मोफत लस देण्याचा निर्धार केला असून ग्रामस्थांनी त्यांच्या कडे असलेल्या लहान मोठ्या सर्व जित्राबाचे संपर्ण लसीकरण करुन घेण्याचे आवाहन सरपंच बंटी पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!