श्री शिवाजी महाविद्यालयात गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन संपन्न

0 32

 

 

परभणी,दि 24 ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिवकालीन गडकिल्ल्यांची ओळख व्हावी म्हणून गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि परभणी शहरातील युवा शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.२२) रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रोहिदास नितोंडे, प्रतिष्ठानचे हनुमान घुंबरे, सचिन वाघ, इतिहास विभागप्रमुख डॉ.परिमल सुतवणे आदींची उपस्थिती होती.
सदरील छायाचित्रे प्रदर्शनात शिवकालीन गडकिल्ल्यांची माहिती देणारे छायाचित्र लावण्यात आली होती. ज्यात त्यांची उभारणी, निर्मिती काळ, शासन आदींची माहिती होती. यात दोनशेच्या वर छायाचित्रांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, इतिहास हा विषय मनोरंजनासह प्रेरणा देणारा आहे. त्यातल्या त्यात गडकिल्ले हे आपल्या शौर्याची गाथा सांगणारे माध्यम आहेत जे येणाऱ्या पिढ्यांना कळाल्या पाहिजेत त्यासाठी असे छायाचित्र प्रदर्शन लावणे महत्वाचे आहेत असे ते मनोगतात म्हणाले. यावेळी डॉ.सलीम मोहियोद्दीन, डॉ.दिगंबर रोडे आदींही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ परिमल सुतवणे, सूत्रसंचालन प्रा. पल्लवी कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.एल.एम.जिरेवाड यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रवीण कदम, डॉ.पी.जे.नादरे एकनाथ देवकर, सय्यद सादिक, सागर खुणे आदींनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!