गजराज प्रतिष्ठानतर्फे भव्य शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आमदार भिमराव तापकीरांच्या हस्ते उद्घाटन

0 23

खडकवासला, प्रतिनिधी – गजराज प्रतिष्ठानतर्फे अभिजीत धोत्रे यांच्या संग्रहातील भव्य शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास आमदार भिमराव तापकीर यांनी भेट देऊन शिवकालीन शस्त्रांची पाहणी केली. हे प्रदर्शन पाहताना सतत छत्रपती शिवराय आणि त्यांच्या सोबत लढलेल्या मावळ्यांची मनात आठवण येत होती. आजच्या पिढीला आणि नागरिकांना अशा प्रदर्शनाची खरंच गरज आहे. अशी प्रदर्शने आयोजित केली जावीत कारण ती आपल्या इतिहासाचा ठेवा आहेत, अशी भावना आमदार भिमराव तापकीर यांनी व्यक्त केली.

या प्रदर्शनाचे आयोजन भाजपाचे पदाधिकारी अशोक दिलीप कोंडे यांनी केले होते.या प्रसंगी आमदार भिमराव तापकीर, दिगंबर डवरी, अरुण राजवाडे, जितेंद्र कोंढरे, ओमकार डवरी व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!