या दिवाळीला द्या पेंच व्याघ्र अभयारण्याला झाडांची भेट 

0 8

पुणे – दिवाळीचे दिवस म्हणजे आनंदाने सण साजरा करण्याचे आणि भेटवस्तूंची मनापासून देवाणघेवाण करण्याचे दिवस असतात. पर्यावरणाबद्दल अधिकाधिक जागरुक असणारे लोक आजकाल त्यांचा वेळ आणि ऊर्जा ग्रीन कॉजला देण्यामध्ये पसंती दाखवतात. गेल्या १२ वर्षांपासून, अगणित लोक Grow-Trees.com या सामाजिक संस्थेशी निगडीत आहेत आणि पर्यावरण तज्ञ सुप्रिया पाटील म्हणतात, “भेटीच्या स्वरुपात झाडे देण्याचा दिवाळी हा अतिशय साजेसा सण आहे, एखाद्याने दान केलेले किंवा भेट दिलेले प्रत्येक रोप, आम्ही पेंच व्याघ्र अभयारण्यात लावलेल्या हजारो झाडांमध्ये भर पाडेल”.

 

 

२०१४ WWF अहवालाप्रमाणे कान्हा-पेंच या क्षेत्रात अंदाजे १२० वाघ आहेत. या क्षेत्रात वाघांच्या सुरक्षित हालचालीची सुविधा आहे आणि नॅशनल टायगर कन्जर्वेशन ऍथॉरिटी (एनटीसीए), वाइल्डलाइफ इनस्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआयआय) यांसह राष्ट्रीय एजन्सींनी याचे जतन करण्याची गरज जाणली आहे. Grow-Trees.comचा “ट्रीज फॉर टायगर्स” उपक्रम आता महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र अभयारण्याच्या जवळ असलेल्या कारवाही गावात या समस्येवर तोडगा काढत आहे. या प्रकल्पाचा उद्देश या क्षेत्रात असलेल्या वन्यजीवांच्या निवाऱ्याचे विस्तारण करणे आहे. मानवाच्या अविवेकी कृती आणि अधिग्रहणामुळे या वसाहती आता कमी होत चालल्या आहेत.

 

 

सुप्रियांच्या मते, “वनरोपणाच्या प्रक्रियेमुळे मानव-प्राण्यांमधले संघर्ष तर कमी होतीलच, सोबत स्थानिक अर्थकारणात देखील समृद्धी येईल. या प्रकल्पाने ग्रामिण लोकांना वर्षभर उत्पन्नाचा स्त्रोत पुरवण्याचे धेय्य बाळगले आहे. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की अधिकाधिक लोक या उपक्रमात सहभागी होऊन वन्यजीवन, जैवविविधता आणि चरितार्थामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणतील.”

 

 

Grow-Trees.com च्या पेंच व्याघ्र अभयारण्याच्या परिसराला/बफर झोनला घनदाट करण्याच्या आणि वाघांच्या निवाऱ्याचे जतन करण्यात मदत करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करताना आयएफएस अधिकारी आणि वरिष्ठ प्रमुख वन संवर्धक (वन्यजीवन)- निवृत्त, महाराष्ट्र सुनिल लिमये म्हणतात, “या झाडांमुळे निसर्गावर आधारीत पर्यटनाला चालना मिळेल आणि क्षेत्रातले मानव-प्राण्यातले संघर्ष कमी होतील. जमातींना रोजगार व उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठीचा हा अतिशय उत्तम प्रकल्प आहे. आपल्याला आपण वसाहती हलवण्यामुळे, प्रदूषण व वन्यजीवनाची हकालपट्टी केल्यामुळे गमावलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा मोठ्याप्रमाणावरच्या वृक्षारोपण उपक्रमांची आवश्यकता आहे.”

 

 

कारवाही गाव गोंडा व मीना समुदायांसारख्या जमातींचे माहेरघर आहे आणि या वृक्षारोपण उपक्रमामुळे सबळता मिळालेल्या सुमित्रा बाई सांगतात, “मी वृक्षारोपणाशी निगडीत अनेक कामांमध्ये सहभागी आहे आणि आता मी मानाने चरितार्थ मिळवू शकते.”

error: Content is protected !!