गिरीषा ठाकरे यांची इनरव्हिल क्लबला भेट

0 32

हिंगणघाट.दि२४ प्रतिनिधी :-स्थानिक ईनरव्हिल क्लब ला डिस्ट्रीक चेअरमन गिरीषा ठाकरे यांनी नुकतीच भेट दिली.क्लब ने सामाजीक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी चेअरमन भेट देत असतात.या भेटीत गिरीषा मॅडम यांनी क्लबच्या माध्यमातुन केलेल्या कार्याचे काैतुक केले.त्यांनी प्रथम एकलव्यआदिवासी आश्रम शाळा वायगाव येथे क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या वेंडीग मशिनचे उदघाटन केले.सायंकाळी शिवसुमन मंगल कार्यालय येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा अनिता मावळे, तर प्रमुख अतीथी चेअरमन गिरीषा ठाकरे व सचिव मेघा नाहर, पुनम गोयंका, विद्या पेंडके, डॉ नयना तुळसकर यांची उपस्थिती होती .दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.अनिता मावळे यांच्या स्नुषा पुजा यांनी स्वागत नृत्य सादर केले.त्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा व क्लबमधे नविन आलेल्या सदस्या संगिता गडवार, साै.चांभारे, अल्फा हुरकट,यांचा सत्कार करण्यात आला.तसेच क्लब सदस्या साै. विद्या खांडरे ह्यांच्या स्नुषा डाॅ.रोमिला यांना साैंदर्य तज्ञ म्हणुन त्यांना पुणे येथे अवाॅर्ड मिळाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना गिरीषा ठाकरे यांनी सांगितले की समाजाला कुटुंबाला दिशा देण्याचे कार्य महीलांच्या हाताने होत आहे.याचा मला अभिमान आहे.आपल्या क्लब चे कार्य अतुलनिय आहे.व टिम ने उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले व राबवत असलेल्या “क्युर” या उपक्रमाबाबत माहिती देऊन वाढत असलेल्या कर्करोग आजाराबाबत जनजागृती करून शिबीर राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले केली.

या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब सदस्य मोठ्या संख्येत उपस्तित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती सारिका डोंगरे आणि श्रीमती रुपल कोठारी यांनी केले. तर आभार श्रीमती पूजा हुरकट यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले

error: Content is protected !!