सेवा आरोग्य फाउंडेशनच्या मुलींनी साजरा केला सैनिकांसोबत रक्षाबंधन सण

0 16

परभणी,दि 11 प्रतिनिधी)ः
राखीपौर्णिमेनिमित्त सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेच्या घे भरारी किशोर विकास प्रकल्प आणि समृद्धी वर्ग प्रकल्पाच्या किशोरवयीन मुलींनी पुण्यातील एका आर्मी युनिटला भेट देऊन सैनिक बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

कार्यक्रमात सुरवातीला सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेच्या घे भरारी किशोर विकास प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख सौ. प्रीती पाटकर यांनी सेवा आरोग्य फाउंडेशनच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. पुणे शहरातील चाळीसहून अधिक वस्त्यांमधील वंचित गटातील आपल्या बांधवांसाठी संस्था आरोग्य, संस्कार व किशोरविकास या क्षेत्रात काम करते.
आजच्या नव्या पिढी मध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी संस्था वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवते असे त्यांनी सांगितलेआणि हा कार्यक्रम राबविण्याची परवानगी दिल्या बद्दल त्यांनी आर्मी युनिट चे आभार मानले.
या भेटी मध्ये संस्थेच्या वस्तीप्रकल्पातील ८५ मुलींनी १२५ सैनिकांना राख्या बांधल्या. मुलींनी घरुन स्वतः आरतीचे ताम्हण सजवून आणले होते. भारतीय संस्कृती प्रमाणे औक्षण करुन त्यांनी सैनिक बांधवांना ओवाळून राख्या बांधल्या तसेच पेढा भरवून आपल्या भावाचे तोंड गोड केले. त्यानंतर या भावांनी सुध्धा आपल्या या बहिणींना गिफ्ट दिले.
या राख्या गेले दोन आठवडे एकत्र जमून मुलींनी स्वतः तयार केल्या होत्या.
दोन लेडी आर्मी ऑफिसर्स नी किशोरींना सैन्यातील करिअर च्या संधी, त्या साठी कशा प्रकारे तयारी करायची असते, अभ्यास कसा करायचा, कुठल्या परीक्षा द्यायच्या याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की कुठलेही ध्येय साध्य करताना फोकस्ड काम करणे गरजेचे आहे, कथनी आणि करनी एक असली पाहिजे. तरच आपण आपले ध्येय सहजपणे गाठू शकतो.
सैनिकांचे अनुभव आणि मार्गदर्शन ऐकून भारावून गेलेल्या मुलींनी उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्न विचारले. लेडी आर्मी ऑफिसर्सनीही खूप प्रेमाने, आस्थेने मुलींच्या प्रश्नांची उत्तरे दिली.मुलींना त्यांच्या बोलण्यातून खूप प्रेरणा मिळाली.
जे लोक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, त्यांच्या मुळे आपण सुरक्षित आयुष्य जगू शकतो त्यांच्या प्रति कृतज्ञता, आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी , नवीन पिढीतील मुलींना आपल्या नागरिक म्हणून जबाबदार्यांची जाणीव होण्यासाठी तसेच या क्षेत्रात मुलींसाठी साठी काय संधी उपलब्ध आहेत याची माहिती होण्यासाठी या क्षेत्र भेटीची आणि आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाची खूप खूप मदत झाली आहे.

या देखण्या आणि उत्साहाने साजर्या झालेल्या कार्यक्रमाला सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेच्या घे भरारी प्रकल्पाच्या ७ किशोरी मैत्रीण, समृद्धी वर्गांच्या २ शिक्षिका मुलींसोबत उपस्थित होत्या.
सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेच्या घे भरारी किशोर विकास प्रकल्प प्रमुख सौ. प्रीती पाटकर, सह समन्वयक सौ मानसी मोरे, समृध्दी वर्ग प्रकल्प प्रमुख सौ. निरंजनी शिरसट यांनी कार्यक्रमाची शिस्तबद्ध आखणी केली. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेच्या घे भरारी व समृद्धी प्रकल्पांच्या पालक संचालक डॉ. हर्षदा पाध्ये, संचालक श्री. प्रदीप जी कुंटे आणि श्री. आनंदजी ओक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

error: Content is protected !!