थकीत पिक विमा द्या,अन्यथा दिवाळीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ‘चटणी भाकर’ आंदोलन करणार-आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे

0 103

परभणी,दि 01 (प्रतिनिधी)ः
दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० चा थकित पिक विमा एकूण ५० कोटी २६ लक्ष रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अन्यथा दिवाळीमध्ये कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या निवासस्थानासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करू अशा मागणीचे पत्र कृषिमंत्र्यांना दिले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम,सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० चा तूर व सोयाबीन या पिकांचा मंजूर असलेला पिकविमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाचा गंगाखेड तालुक्यातील १३ कोटी ३८ लक्ष व सोनपेठ तालुक्यातील ६ कोटी ५८ लक्ष व तुर या पिकाचा गंगाखेड तालुक्यातील ११ कोटी ५१ लक्ष व पालम तालुक्यातील १८ कोटी ७१ लक्ष असा एकूण ५० कोटी २६ लक्ष एवढा थकीत पिक विमा अद्याप मिळाला नाही हा शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्यायच मानावा लागेल. दिवाळीच्या सेन गोड व्हावा याकरिता थकीत मंजूर पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करणे अत्यंत आवश्यक आहे. दिवाळीचा सण गोड-धोड खाऊन आपण साजरा करणार परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र कायम चटणी भाकर !
दिवाळीपूर्वी खरीप हंगाम २०२० चा सोयाबीन व तूर या पिकाचा मंजूर असलेला पिकविमा शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अन्यथा दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळीच्या सणात आपल्या म्हणजेच कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या निवासस्थाना समोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!