तरूणाईला कौशल्यपूर्ण नौकरी द्या :सुनिल गुट्टे-५ व ६ नोव्हेंबरला गंगाखेड येथे जिल्हास्तरीय नौकरी मेळावा

1 66

 

 

परभणी :.28 (प्रतिनिधी)– देशात वाढत असलेली बेरोजगारी चिंता वाढवणारी असून त्यामध्ये कोरोनाने भर घातली आहे. बेरोजगारीची सरकारी आकडेवारी सुध्दा भयानक स्वरूपाची आहे सुशिक्षित युवकांना काम नसल्यामुळे शेतात किंवा गाई-म्हशीकडे लक्ष द्यावे लागत आहे, कला आणि कौशल्य असूनही काम मिळत नसल्याने शहरी आणि ग्रामीण तरुण निराशेच्या गर्तेत अडकले आहेत,तरीही ते परिस्थितीशी दोन हात करीत आहेत, परंतु त्याचा वापर केवळ संभासाठी गर्दी करण्यासाठी किवाप्रचारासाठी केला जात आहे त्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणाच्या हातात पक्षीय झेंड्याचा दा़ंडा देण्यापेक्षा कौशल्यपूर्ण नौकरी दया, असे स्पष्ट आवाहन युवा उद्योजक सुनिल गुट्टे यांनी केले आहे.

गंगाखेड विधानसभेचे आ डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून आयोजित परभणी जिल्हास्तरीय नौकरी मेळाव्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शहरातील हॉटेल राधिका पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, आ डॉ रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे ,माजी नगरसेवक सचिन देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप आकनुरे,अॅड मिलिंद क्षिरसागर, जनसंपर्क अधिकारी हनुमत लटपटे उपस्थित होते.

पुढे बोलताना सुनिल गुट्टे म्हणाले की भारत हा तरुणाचा जसा देश आहे तसाच तो बेरोजगाराचा सुध्दा देश आहे. बेरोजगारीमुळे गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता व इतर समस्या निर्माण होत आहेत. हाताला काम नसल्याने तरुण निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. त्यातून काही ठिकाणी आत्महत्या सुध्दा होत आहेत.अशी बरीच कारणे लक्षात घेऊन आम्ही केवळ गंगाखेड मतदार सघच नव्हे तर संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी भव्य असा नौकरी मेळावा येत्या ५ व ६ नोव्हेंबरला गंगाखेड येथील संत जनाबाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात घेत आहोत. मेळाव्यात सुरक्षारक्षक, सुपरवायझर, टेलिकॉलर, डिलिव्हरी बॉय, नर्स, शिपाई, क्लर्क ड्रायव्हर, टायपिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासह आयटीआय, इंजिनिअरींग, मेडीकल, सोशल मिडीया, ग्राफिक डिझाईनर व्हिडीओ एडीटर अशा विविध पदासाठी भरती केली जाणार आहे.
त्यामध्ये परभणीसह पुणे मुंबई, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर येथून ५० कंपन्या सहभागी होत आहेत .त्यातून जवळपास ३५०० तरुण-तरुणींना नौकरी मिळणार आहे. मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्हातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत तब्बल ४००० गरजू उमेदवारांनी सहभागासाठी नावनोंदणी केली आहे तसेच येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत नावनोंदणीची प्रक्रिया चालणार आहे. मेळाव्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी झाली असून आता प्रत्यक्ष मेळाव्याची उत्सुकता आम्हाला आहे.

नौकरी मेळावा तरुणांना दिलासा देणारा ठरेल राजेंद्र डोंगरे

मराठवाड्यातला परभणी हा साधु-संताचा आणि कवी साहित्यिकाचा जिल्हा आहे. दुष्काळाच्या जखमा घेऊन वाटचाल करणाऱ्या परभणी जिल्हयाच्या विकासाचा मोठा अनुशेष आहे त्यामुळे इथला युवक सुध्दा रोजगाराच्या शोधात पुणे-मुंबईत स्थलातरीत झालाय मात्र कोरोनाच्या लाटेत अनेकाचे रोजगार गेले त्यामुळे हाताला काम नसलेल्या पोरानी आपापल्या गावाची वाट धरली. खेड्यात परतलेली हि पोर गाई-म्हशीच्या मागे फिरताहेत नागराला आणि कुळवाला जुपली गेली आहेत. हि परिस्थिती एकट्या परभणीची नाही तर सपूर्ण मराठवाड्याची झाली आहे उच्च शिक्षित किंवा कला-कौशल्य असणारे हात बेराजगारीचा शिक्का मिरवत गावखेड्याच्या पारावर बसून आहेत त्यामुळे त्याचे कुटुबीय सुध्दा चिंतेत आहेत म्हणून शिकल्या सावरलेली पौर हताश आणि निराश झालीत त्यामुळे त्यांना निराशेतून बाहेर काढून आनंद देण्यासाठी आयोजित केलेला हा मेळावा निश्चित दिलासा देणारा ठरेल अशी अपेक्षा गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यानी बोलताना व्यक्त केली.

error: Content is protected !!