सामाजिक भावनेतून मदतीचा हात देण्यासाठी दातृत्व असावं लागतं-अमृता फडणवीस

गंगाखेड येथे दिव्यांग साहित्य वाटप आणि पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

0 179

 

परभणी,दि 16 (प्रतिनिधी):-
गरजूंवताची अडचण समजून घेणे. त्यांना मदत करणे. त्यांच्याशी आपुलकीने वागणे काळाची गरज आहे, याचे भान असलेली माणसं सामाजिक स्तरावर परिवर्तन घडवित असतात. त्यामुळे दिव्यांगाशी नातं जोडून त्यांच्या अडी-अडचणी दूर करणारा हा सामाजिक सोहळा परिवर्तनांची नांदी ठरेल. त्यासाठी सामाजिक भावनेतून मदतीचा हात देण्यासाठी दातृत्व असावं लागतं आणि हेचं दातृत्व आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अंगी आहे. त्यामुळेच हा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला आहे, असे गौरोद्वार सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी काढले.

मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील कापसे गार्डन येथे आयोजित केलेल्या दिव्यांग साहित्य वाटप आणि गौरी-गणपती सजावट स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद येरमे,युवा उद्योजक राजाभाऊ फड, सुनील गुट्टे, प्रकल्प समन्वयक विष्णू वैरागड, रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव निरदुडे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, राजेभाऊ सातपुते, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, प्रतिष्ठानचे सचिव अँड.मिलिंद क्षिरसागर, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, पत्रकार पिराजी कांबळे उपस्थित होते.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, आजच्या राजकारणात सामाजिकता थोडीसी बाजूला होत आहे. केवळ राजकारणासाठी प्रश्न आणि समस्यांचे भांडवल केले जाते. परंतु ज्यांच्या संस्कारातच सामाजिक वसा आणि वारसा आहे, ते लोक राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करतात. अशा मोजक्या लोकांमध्ये आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचा समावेश होतो. त्यामुळेचं त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू लोकांचे शिबीर घेउन हा मदतीचा हात दिला आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आंचल गोयल, युवा उद्योजक सुनिल गुट्टे यांनीही मनोगते व्यक्त केले. गौरी सजावट स्पर्धेचे निकाल वाचन प्रभाकर सातपुते तर सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेच्या निकालाचे प्रतिष्ठाने सचिव आणि संयोजन समिती प्रमुख अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा पोले, हनुमंत लटपटे, पिराजी कांबळे, प्रभाकर सातपुते, मदन बनसोडे, अभिजीत चक्के, शाम ठाकूर, सचिन राठोड, ऋषिकेश बनवसकर, राहूल गाढे, संजय मुढे, जर्नाधन यादव, गणेश मिजगर, दुर्गेश वाघ, मारूती पोले, धनराज बिडगर, सुनिल तांदळे, हनुमंत गुट्टे, दयानंद टोणपे, राधाकृष्ण कुंडगिर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

दिव्यांगाच्या चेह-यावरचा आनंद हेचं माझं यश आणि समाधान – आ.डाॅ.गुट्टे
चांगलं काम करताना विरोधक बोलतचं असतात. मात्र, मी त्यांची पर्वा न करता माझं कर्तव्य आणि जबाबदारी पूर्ण करीत आहे. त्यामुळेच विरोधकांना माझ्या कामाची धडकी भरत असते. तीन तालुक्याचं प्रतिनिधीत्व करीत असताना मी नेहमी समान न्याय देण्याचा प्रामाणिक केला आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, वीज यासह वर्षानुवर्ष रेंगाळलेले प्रश्न मी सोडविले आहेत. बसस्थानक, रस्ते याही बाबतीत मी भरपूर निधी आणला आहे. विकास कामाबरोबरचं मी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळेचं आज हा सामाजिक सोहळा आयोजित केला आहे. इथं जे माझे दिव्यांग बांधव आहेत. त्यांच्या चेह-यावरचा आनंद हेचं माझं यश आणि समाधान आहे. त्यामुळे भविष्यातही मी अजून जोमाने काम करणार असून जेष्ठ नागरिकांसाठीही असाचं एक मोठा उपक्रम राबविण्याचे मी निश्चित केले आहे.

 

अन् सुनिल गुट्टेंची फर्माईश पूर्ण झाली…
अमृता फडणवीस भाषण करीत असताना त्यांच्या पाठीमागे बसलेले आ.डाॅ.गुट्टे यांचे चिरंजीव युवा उद्योजक सुनिल गुट्टे यांनी गाणे म्हणण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान ठेवून अमृता फडणवीस यांनी ‘तु चाल पुढे बघ धुळ उडे आस्मानाला‘ हे आगामी चित्रपटातले गाणे म्हटले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली. त्यामुळे सुनिल गुट्टेंची फर्माईश पूर्ण झाल्याची चर्चा सभागृहात रंगली होती.

 

error: Content is protected !!