वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची दैदिप्यमान शैक्षणिक वाटचाल

0 51

गुरुदत्त वाकदेकर
मुंबई,दि 23 ः
शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शिक्षण संस्था कार्यरत असून त्यांची दैदिप्यमान वाटचाल ही समर्पित आणि समाजाप्रति असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सुरु आहे. त्याचे बरेचसे श्रेय सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्याकडे आहे. कारण प्रगत आणि सुनियंत्रित प्रशासनातून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संस्थांची यशस्वी धुरा गेल्या अनेक दशकाहून दीर्घकाळ त्यांनी सांभाळली आहे. उच्चशिक्षित आणि नेतृत्वक्षमतेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व असून अनोखी शिस्त व कामाप्रति कमालीचे समर्पण त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. शिक्षण क्षेत्रातील कार्याला तसेच विचारांना अधिक प्रगल्भतेने सादर करतानाच अनेकांसाठी ते प्रेरणा आणि आशेचा स्त्रोत ठरले आहेत. संस्थेचा कारभार त्यांनी विद्याविस्तारातून सर्वदूर नेला आहे तसेच एका सर्जनशील व्यक्तिमत्वातून नव्या पिढीला घडविण्याचे कार्यदेखील त्यातून त्यांनी साध्य केले आहे.

नवे उपक्रम, चालू घडामोडी, भविष्याचा वेध, शिक्षणाची दिशा, सामाजिक बांधिलकी, नवे शैक्षणिक धोरण अशा सूत्रांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संस्थांचे कार्य सुरु आहे. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, एप्लाईड आर्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विधि या विषयांच्या पाचही महाविद्यालयांनी शैक्षणिक क्षेत्रातील आपले स्थान अधोरेखित केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरे, ठाणे, नवी मुंबई या शहरांच्या मध्यभागी सुमारे ७.५ एकर जागेवर १९९० सालापासून गेली तीन दशके या महाविद्यालयांतून अभियंते कुशल अभियंते आज समाजासाठी कार्य करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. एआयसीटीई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम इथे सुरू आहेत. १९९० मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयानंतर २०१८ मध्ये वास्तुकला, त्याच दरम्यान उपयोजित कला तसेच २०२० सालापासून विधि तर २०२१ पासून कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ही महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. २०२२-२३ वर्षापासून मुंबई विद्यापीठांतर्गत ऑनर्स डिग्री प्रोग्रामदेखील सुरु करण्यात आला आहे. यात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, सायबर सेक्युरिटी हे प्रोग्राम आहेत. त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन्स, संगणक व माहिती-तंत्रज्ञान या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नवीसंजीवनीसारखा ठरत आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी त्यांना त्वरित उपलब्ध होत आहेत. विदेशी भाषांचे अभ्यासवर्ग हेदेखील अतिरिक्त प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे. संस्थेने गेल्या वर्षी नवीन उद्यमींसाठी (स्टार्ट अप) इनक्युबेशन सेंटरदेखील उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून आज ३ नवउद्यमी उपक्रम राबविले जात आहेत.
संस्थेचा स्वतंत्र असा प्रशिक्षण आणि नियुक्ती विभाग आहे. त्यातून नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, मुलाखत मार्गदर्शन यांचे नियमित आयोजन करण्यात येते. व्यवहारिक ज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकासदेखील घडवून घेतला जाते. तसेच विविध प्रकारच्या नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशाला एक सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था आणि व्यवस्थापन कटीबद्ध आहे.
संस्थेचे अध्य़क्ष नंदकुमार काटकर यांनी नुकताच अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला असून त्यांच्या आणि जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली संस्थांचे व्यवस्थापन सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २४० जणांना वडाळा तर ३६० विद्यार्थ्यांना कांदिवली येथे अवघ्या १० हजार रुपये अल्प अशा वार्षिक शुल्कात वसतिगृह उपलब्ध केले आहे. यामागे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सामाजिक हेतू आहे. संस्थेच्या कर्मचारीवर्ग ही व्यवस्थापनाची खरी ताकद आहे. समर्पण आणि काम करण्याची सचोटी, मेहनत या त्यांच्या सहकार्याचा फार मोठा वाटा संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्याने राहिला आहे. त्याचबरोबर शिक्षक वर्गालादेखील वेळोवेळी अद्यावत राहता यावे, यासाठी प्रशिक्षण तसेच विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यावर व्यवस्थापनाचा भर राहिला आहे.
केवळ शैक्षणिक कार्य नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. यात ज्ञानदान म्हणजेच शैक्षणिक पुस्तकांची मदत, गरजूंना कपड्यांचे वाटप, रक्तदान, अनाथाश्रमांना मदत, तळागाळातील गरजू युवतींसाठी लग्न समारंभात संसारोपयोगी साहित्यांची मदत करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. रक्तदान शिबिरांबरोबरच या विद्यार्थ्यांनी सागरी किनारे स्वच्छता मोहीमदेखील राबवली. सामाजिक जाणीव व देशसेवा ही भावना विद्यार्थीदशेतच युवकांच्या मनात वृद्धींगत करण्याचा हा हेतू आहे.
त्याचबरोबर नुकतेच संस्थेच्या वतीने कायदेविषयक मोफत सल्ला गरीब व गरजूंना उपलब्ध व्हावा, यासाठी लिगल एड क्लिनीक हा उपक्रम सुरु करण्यात आला असून न्यायालयीन बाबींवर होणारा वारेमाप खर्च त्यामुळे गरजूंच्या आवाक्यात आला आहे. त्याचे स्वागत सर्वस्तरावर होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील अनेक न्यायालयीन खटल्यांच्या वेळी शिक्षकांना कायदेशीर मदत करण्याबाबत अॅड. आप्पासाहेब देसाई यांचा लौकिक आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून ५ सप्टेंबर २०२२ या दिवशी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई व परिसरातील शिक्षकांनी त्यांचा भव्य सत्कार करत मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हा बहुमानाचा पुरस्कार बहाल केला. यावेळी विचार व्यक्त करताना त्यांनी शैक्षणिक धोरणात शिथिलता आणून समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षण सोपे करावे तसेच गरीब व गरजूंना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेण्याची संधी मिळावी, ही तळमळ व्यक्त केली. भारतातील गरीबी दूर करायची असेल यानुसार कृती होणे गरजेचे आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. त्याचे सर्वांनीच स्वागत केले.
केंद्र सरकारच्या उद्दिष्टानुसार नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२४ पर्यंत अपेक्षित आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा तसेच समाजात शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी संस्था आतापासूनच तयारी करत आहे. त्या अनुषंगाने नवनवीन संकल्पना तसेच उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकंदरीत संस्थेच्या विकासासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावेत, या हेतूने संस्थेच्या सर्व घटकांनी, विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांनी काम करावे, हे उद्दिष्ट साध्य कऱण्यासाठी पालक वर्गानेही सहकार्य द्यावे, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर आणि जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांना आहे. त्यानुसार त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेचे व्यवस्थापन कार्यरत आहे.
सध्या संस्थेच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलभूत व पायाभूत सुविधा तसेच शिक्षकांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी यांच्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे उद्दिष्ट देखील संस्थेने ठेवले आहे. लवकरच संकुलात नवे व अद्यावत इंटरनॅशनल स्कूल सुरु करण्याचा संकल्प अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी केला आहे.

error: Content is protected !!