शालेय वयातच ध्येय निश्चित करावे : प्रवीण तरडे

विचारपूर्वक निर्णय घ्यावा : प्रा. नितीन बानगुडे

0 44

पिंपरी,दि 17 ःआपल्याला जीवनात पुढे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, उद्योजक, शासकीय अधिकारी, सैन्यातील अधिकारी, समाजसेवक, संशोधक यापैकी काय व्हायचे आहे याचे विद्यार्थ्यांनी शालेय वयातच ध्येय निश्चित करावे. भविष्यात शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील. शेती शिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे शेती विकू नये. या सामान्य शेतकऱ्यां मध्येच मी ” माणूस” शोधत असतो. तो सामान्य माणूसच माझे प्रेरणा स्थान आहे असे प्रतिपादन अभिनेते प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १५ ऑगस्ट रोजी पिंपळे निलख आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवीन प्रविण तरडे बोलत होते.
यावेळी ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एक स्मार्ट वॉच, एक स्कूल बॅग आणि सन्मान चिन्ह तसेच इतर पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. दिनकर दादोबा मालेकर, डॉ. जयसिंग कदम, डॉ. बाळकृष्ण रंगदळ, शांताराम हरिभाऊ साठे, भरत इंगवले, अनिल संचेती, कैलाससिंह चव्हाण, वनिता दीपक माकर, विजय पाटुकले, शंकर तांदळे, साई कवडे सनी शिंदे यांचा तसेच पिंपळवण वृक्ष संवर्धन ग्रुप आणि इंडियन सायकलिंग क्लब या संस्थांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे, उद्योगपती करुणानिधी दालमिया, भुलेश्वर नांदगुडे, प्रकाश बालवडकर, अनंत कुंभार, काळूशेठ नांदगुडे, माणिक भांडे, माऊली बालवडकर, संतोष तात्या साठे, माऊली साठे, बाबासाहेब इंगवले, रवी काटे, सचिन साळुंखे, निवृत्त पोलिस अधिकारी नागेश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, टोणपे, माने,कदम, आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. नितीन बानगुडे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. एकदा निर्णय घेतला की पुन्हा मागे वळून पहायचे नाही. अपयश आले तरी प्रयत्नात सातत्य ठेवावे.
स्वागत प्रास्ताविक
सचिन साठे, सूत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार विजय चंद्रकांत जगताप यांनी मानले.

error: Content is protected !!