नंदोरी रोडवर मृतावस्थेत आढळला गोंदीर

0 184

हिंगणघाट,दि 11(प्रतिनिधी)ः
नंदोरी रोडवर मृत अवस्थेत गोंदीर आढळून आला त्याचे निरीक्षण केले असता ते गोंदीर असल्याचे लक्षात आले.प्रथम दर्शनी ते उंदिरा सारखे दिसत असेल तरी त्यांचा लांब शेपटीचा टोकावर केसांचा झुबका असतो तसेच समोरचा पाया पेक्षा गोंदीर चे मागील पायाची लांबी जास्त असते. मागील पाय लांब असल्या मुळे गोंदीर कांगारू सारखे उड्या मारत चालतात.भारतातील उष्ण मैदानी पट्टे यांचे अधिवास आहे .इंग्रजीत गोंदीर ला (gerbil) गर्बिल तर हिंदीत हिरणमुसा म्हणतात.हे निशाचर असून फक्त रात्री बिळातून बाहेर पडतात एकदाचा वाघ दिसेल पण यांचे दर्शन होणे कठीण असते.गोंदीर ची नर ,मादी वेगवेगळे बिळ बनवतात त्यांची बिळे एकमेकांशी जोडलेले असतात त्यातून ते संबंध ठेवतात .यांचा बिळात अन्न साठवण्यासाठी वेगळी जागा असते तसेच पळवाट सुध्दा असते जी नेहमी बंद असते गरजेचा वेळी तिचा वापर केला जातो.बिया, कंदमूळ, गवत , पाने,कीटक, अळ्या,अंडी इत्यादीचा समावेश यांचा खाद्यात होत असते.हिंगणघाट भागात मैदानी पट्टे असल्यामुळे यांची मोठी संख्या आपल्या भागात आढळते.गोंदीर निशाचर असून लहान आकाराचे असल्या मुळे सहसा दृष्टीस पडत नाही त्यामुळे वन्यजीव अभ्यासकाना वाघाचे दर्शन होते परंतु यांचे दर्शन होत नाही.अशी माहिती निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट तर्फे देण्यात आली आहे.

error: Content is protected !!