महाराष्ट्र सरकारकडून कोरोना निर्बंधात सुधारणा, जाणून घ्या काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

0 423

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना आणि त्याचे नवीन ओमिक्रॉन प्रकार झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने शनिवारी अनेक निर्बंध जाहीर केले होते. यानंतर रविवारी सरकारने निर्बंधात बदल केले. सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ब्युटी सलून हे हेअर कटिंग सलूनसह गटबद्ध केले जातील आणि 50% क्षमतेसह खुले राहण्याची परवानगी दिली जाईल. जिम ५०% क्षमतेने उघडतील. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल.

जिम, ब्युटी पार्लर्स पूर्णतः बंद करण्याचे आदेश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी राज्यातील पहिला, दुसऱ्या लाटेदरम्यान जिम, ब्युटी पार्लर्सचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ठाकरे सरकारने आता आपल्या नव्या आदेशात सुधारणा करून जिम आणि ब्युटी पार्लर्सना दिलासा दिला आहे. जिम, ब्युटी पार्लर्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. फक्त लसीचे दोन डोस झालेल्या कर्मचारी आणि व्यक्तींना जिम आणि ब्युटी पार्लर्समध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. तसेच यावेळी मास्क शेवटपर्यंत वापर करणे बंधनकारक असणार आहे.

मिनी लॉकडाऊनदरम्यान आणखीन काय सुरू राहणार?
खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
शॉपिंग मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
दोन्ही डोस घेतलेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा
सलून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा

राज्यात सध्या कोणते निर्बंध लागू?
१. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
२. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
४. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
६. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
७. जलतरण तलाव बंद राहणार.
८. केशकर्तनालये, ब्युटी पार्लर आणि जीम ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
९. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
१०. प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
११. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
१२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
१३. नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
१४. आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार.
१५. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.

error: Content is protected !!