सेलूत राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल खेळाडूच्या हस्ते ज्योत व पथसंचलन

0 105

 

सेलू, नारायण पाटील – टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने फेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने २४ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा सेलू येथे दि. ३० डिसेंबर रोजी सायं ५ वा. फेन्डस क्लब क्रीडांगणावर उद्घाटन थाटात संपन्न झाले.

 

या स्पर्धेत राज्य संघटनेचे मान्यतेने राज्य तील २२जिल्हा पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. सहभागी संघाची भोजन व्यवस्था व निवास व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रकाश झोतात दोन क्रीडांगण तयार करण्यात आले आहे.

 

आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल खेळाडू च्या हस्ते ज्योत व पथसंचलन,दांडू पट्टा, तलवारबाजी, लेझीम पथकांनी शहरवासीयांना उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल महासंघाचे महासचिव डॉ.व्यंकटेश वांगवाड, उद्घाटक नू.वि.शि.सं सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, साईबाबा बॅक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, डॉ.माधव शेजुळ (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) प्रा.मंहमद इकबाल ( क्रीडा महर्षी राज्य फुटबॉल संघटक) विभागीय सचिव रामेश्वर कोरडे, राज्य सदस्य संजय ठाकरे,
मा.रणजित काकडे (जिल्हा अध्यक्ष शा.शि.शि.संघटना)हे मान्यवर उपस्थित होते.
राज्य स्पर्धेत सहभागी जिल्हा संघ: परभणी,बीड,हिंगोली, पुणे. अकोला, मुंबई उपनगर नांदेड. वाशिम,औरंगाबाद,नागपूर सांगली, सोलापूर, बुलढाणा
अमरावती ,नंदुरबार , जालना. नाशिक,परभणी मनपा,नागपूर मनपा,यवतमाळ ,लातूर,कोल्हापूर,सोलापूर मनपा, चंद्रपूर, अमरावती. परभणी लातूर औरंगाबाद बीड, बुलढाणा, संघाची विजयी घोडदौड पंच. किरण घोलप ,राहुल पेटकर, सुनील हिवाळे, संतोष शिंदे सिद्धांत लिपने ,निनाद रहाटे गणेश पाटील, स्पर्धा परभणी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, कार्याध्यक्ष विनोदराव बोराडे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत बोराडे, आयोजन समितीचे सचिव ओमप्रकाश तोष्णीवाल, राज्य महासचिव गणेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोराडे, गिरीष लोडाया, राजेश गुप्ता, रविंद्र कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर ,प्रा.नागेश कान्हेकर जिल्हा सचिव सतिश नावाडे, डी.डी.सोन्नेकर, प्रशांत नाईक , नंदलाल परताणी, मदनलाल करवा, ज्ञानोबा आण्णा बोराडे, जुगलकिशोर बाहेती, भाऊसाहेब केवारे, तुकाराम बोराडे,भास्कर बोराडे, राजेंद्र बोराडे, शाम झंवर, उध्दव पवार, रविंद्र केवारे, सुरेंद्र गिल्डा, अतुल बोराडे, जिकर भॉई, पंकज सोनी, किशोर ढोके आदी परीश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!