वेग, सुरक्षा आणि सुविधेची हमी… पहा वंदे भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

0 240

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कालपासून गुजरात दौऱ्यावर (Gujarat Visit) असून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आणि उपाययोजनांचं उद्घाटन केलंय. आजही ते गुजरातची राजधानी गांधीनगर (Gandhinagar) येथे गेले असून तेथे स्वदेशी बनावटीच्या हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला (Highspeed Vande Bharat Express) हिरवा कंदील दाखवला आहे. गांधीनगरसह मुंबई सेंट्रलमध्येही या हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झाले आहे.

dr. kendrekar

 

१५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांदरम्यान ७५ वंदे भारत गाड्या देशाच्या कानाकोपऱ्याला जोडल्या जातील अशी घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत दोन ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. वेग, सुरक्षा आणि सेवा या तीन तत्त्वांवर या एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत.

 

वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात शताब्दी ट्रेनप्रमाणे ट्रॅव्हल अपार्टमेंट्स आहेत. प्रवाशांना या ट्रेनमध्ये प्रवासाचा चांगला अनुभव मिळेल. वेग आणि सोयीच्या दृष्टीने ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी मोठी झेप आहे. या ट्रेनचा प्रवास वेळ 25 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे.

 

 

चेन्नईतल्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत फक्त 18 महिन्यांत ही ट्रेन तयार झाली. ताशी 160 किमी एवढ्या वेगानं ही ट्रेन सुसाट धावू शकते. काही सेकंदातच वेग पकडते. म्हणूनच वेग आणि सुविधांचे निकष पाहिले तर भारतीय रेल्वेची ही मोठी झेप मानली जातेय.

 

ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे, जीपीएस आधारीत ऑडिओ व्हिज्युअल प्रवासी सूचना प्रणाली, मनोरंजनासाठी ऑनबोर्ड हॉटस्पॉट, वायफाय सुविधा आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये 180डिग्रीत फिरणारे सीट आहेत. तसेच साइड रिक्लायनरलची सुविधा आहे.

 

सुरक्षेसाठी कोचच्या बाहेर रिव्ह्यू कॅमेरे, चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे लावले आहेत. नियंत्रणासाठी नव्या कोचमध्ये सेफ्टी इंटिग्रेशन सर्टिफिकेशन आहेत.
विशेष म्हणजे ट्रेनमध्ये अटेंडंट कॉल बटण, बायो टॉयलेट, ऑटोमॅटिक डोअर, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्लायनिंग सुविधा आणि आरामदायी सीट आहेत. देशातली ही तिसरी वंदे भारत रेल्वे आहे. यापूर्वी नवी दिल्ली- कटरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या दोन मार्गांवर ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे.

 

 

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस अहमदाबादहून दुपारी 2 वाजता निघेल. त्याच दिवशी संध्याकाळी 7.35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. मुंबई सेंट्रवरून सकाळी 6.20 वाजता ही ट्रेन असेल. दुपारी 12.30 वाजता ती गांधीनगरला पोहोचेल. रविवारी या ट्रेनला सुटी असेल. ही ट्रेन जेवढी लक्झरी आहे. तसा तिकिटांच्या दरातही फरक आहे. मुंबई ते सूरत चेअर कारचं भाडं 690रुपये आहे. मुंबई ते वडोदरा हे तिकिट 900 रुपये असेल. मुंबई ते अहमदाबाद हे तिकिट 1060 रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचे दर आणखी जास्त असणार आहेत.

error: Content is protected !!