पालकमंत्री की जिल्हाधिकारी? कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण? यादी प्रसिद्ध

0 171

मुंबई – देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. परंतु, राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची नेमणूक झाली नसल्याने यंदा १५ ऑगस्टला काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून ध्वजवंदन (Indian flag hoisting) केले जाणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये राज्यातील नवनिर्वाचीत मंत्री ध्वजवंदन करणार आहेत.

 

राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाले असून, आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटाच्या 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यांत ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप आणि पालकमंत्री अद्यापही निश्‍चित झालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार आहे याची यादीच प्रसिद्ध केली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहणात झेंडावदन करणार असून, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमध्येही झेंडावंदन करणार आहेत. चंद्रकांत पाटील (पुणे), राधाकृष्ण विखे-पाटील (अहमदनगर), गिरीश महाजन (नाशिक), दादाजी भुसे (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव), रवींद्र चव्हाण (ठाणे), मंगलप्रभात लोढा (मुंबई उपनगर), दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदीपान भुमरे (औरंगाबाद), सुरेश खाडे (सांगली), विजयकुमार गावित (नंदुरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना), संजय राठोड (यवतमाळ) अशा पद्धतीने संबंधित मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार देण्यात आलेत. तर इतर जिल्ह्यांतील झेंडावंदनाचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!