शेतकरी अभ्यास दौ-यानिमिताने मार्गदर्शन

0 65

बा-हे, प्रतिनिधी – तालुक्यातील घागबारी येथील निखिल कृषी सेवा केंद्र तसेच तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी अभ्यास दौ-यानिमिताने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंतामण गायकवाड हे होते.

कोपरगाव (अहमदनगर) तालुका कृषी विभाग अंतर्गत शेती शिवार अभ्यास दौऱ्यावर तालुक्यातील 40 प्रगतशील शेतकरी यांनी घागबारी परिसरात स्ट्रॉबेरी, सोयाबीन, टोमॅटो आणि भात शेतीची पाहणी केली. या अभ्यास दौऱ्याचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, जळगाव येथील संशोधक डॉक्टर पोपटराव खंडागळे तसेच कोपरगाव कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. कोपरगाव येथून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान घागबारी परिसरातील सर्व सदस्यांनी केला.

तसेच उंबरपाडा (दिगर) ग्रामपंचायत माजी सरपंच भगवान गायकवाड , शास्त्री गावित , हेमलता गायकवाड कृषी सहाय्यक (सराड ) आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक नामदेव पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण सहकार्य निखिल कृषी सेवा केंद्राचे संचालक देवेंद्र गायकवाड यांनी केले तसेच विविध प्रकारे अत्याधुनिक शेतीकडे तसेच शेतीतून विकासाकडे कसे पोहोचलो याचे सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव येथील संशोधक डॉक्टर पोपटराव खंडागळे साहेब यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष चिंतामण गायकवाड यांनी स्विकारले. या कार्यक्रमात शेतकरी तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने मा.श्री. तुळशीदास पिठे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन घागबारी गावचे पोलीस पाटील श्री.गोपाळ गायकवाड यांनी केले. फोटो- घागबारी येथे शेतकरी अभ्यास दौ-यानिमिताने मार्गदर्शन करताना चिंतामण गायकवाड.

error: Content is protected !!