दोन्ही पाय नसतानाही हाताने धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव, पाहा व्हिडिओ

0 370

प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत. या जगात असे कोणतेही काम नाही जे मनुष्य करू शकत नाही. हिंमत असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते असे म्हणतात. काही लोकांसाठी मार्ग सोपा होतो तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडे एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, या व्यक्तीचे नाव झिऑन क्लार्क आहे. लहानपणापासूनच त्याला दोन्ही पाय नाहीत, पण आज तो सर्व अडथळे पार करून खेळाडू बनला आहे.

 

झिऑन क्लार्क Jion Clarke दोन्ही हातांनी धावतो. अलीकडेच त्याने एक विश्वविक्रमही केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

व्हिडीओमध्ये झिऑन क्लार्क दोन्ही हातांनी धावताना दिसत आहे. तो जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे. त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

error: Content is protected !!