गुजरात विधानसभा : १ आणि ५ डिसेंबरला मतदान तर ‘या’ तारखेला निकाल 

0 40

Gujarat Election News: आताची मोठी राजकीय बातमी. गुजरात राज्यात दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. (Gujarat Elections 2022) याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्याप्रमाणे पहिला टप्पा 1 डिसेंबरला होणार आहे. तर दुसऱ्या टप्पा 5 डिसेंबरला होणार आहे. (Gujarat assembly polls to be held in two phases on December 1 and 5; results on December 8 )

dr. kendrekar

 

गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

 

 

182 सदस्यीय विधानमंडळासाठी ही निवडणूक होत आहे. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यानुसार या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये, 10 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार, 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 4.04 लाख पीडब्ल्यूडी मतदार आहेत; 9.8 लाख 80 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

error: Content is protected !!