कोरोना महामारीच्या काळामध्येही ज्ञानसागर इंग्लिश स्कूलचे 5 वी च्या स्काॅलरशीप परिक्षेत घवघवीत यश

0 140

आखाडा बाळापूर – येथील ज्ञानसागर इंग्लिश स्कूलने यावर्षीच्याही स्काॅलरशीप परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या शाळेतील पाचवीच्या 34 पैकी 10 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास होऊन शाळेचा तसेच आपल्या कुटुंबाचा परिसरात मान-सन्मान वाढविला आहे.  विशेष म्हणजे कोरोना महामारी काळामध्ये ज्ञानसागर इंग्लिश स्कूलने खचून न जाता स्काॅलरशीप चे ऑनलाईन क्लास सुरू केले व त्यामध्ये सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांचे निरंतर क्लास, ऑनलाईन माॅकटेस्ट घेऊन त्यांची तयारी करून घेऊन मार्गदर्शन केले.

ऑनलाईन क्लास घेताना असंख्य अडचणींचा विद्यार्थी तसे शिक्षकांना सामना करावा लागला. पंरतु विद्यार्थ्यांचे मनोबल खचू न देता त्यांना सदैव प्रोत्साहन देवुन स्पर्धेत आणण्याचे व स्पर्धेत टिकविण्याचे कार्य सातत्याने करावे लागले असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री बालासाहेब हेंद्रे यांनी व्यक्त केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ निर्मले तसेस श्री आनंद काजळे सरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकवृंद अमोल धुळे, ज्योती कदम, उषा निर्मले, अपर्णा वसमतकर, देवानंद काळे, सतिश भिसे, शिवाजी पाईकराव, संतोष वसमतकर, आशिष उमरे, पांडुरंग बंडाळे, गजानन करंडे आणि सुरेश भिवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!