‘ओजस्वी’ च्या वाढदिवसानिमित्त थेट पंतप्रधानांकडून शुभेच्छा

0 28

परभणी,दि 22  (प्रतिनिधी) ः
शहरातील व्यंकटेश नगर येथे राहणारे तथा सरस्वती विद्यालयातील सहशिक्षक गोपाळ मंत्री व त्यांची पत्नी अभिलाषा यांची कन्या कु. ओजस्वी हिचा प्रथम वाढदिवस दिनांक 17 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुद्धा 17 सप्टेंबर रोजी होता या अनुषंगाने गोपाळ मंत्री यांनी पंतप्रधान कार्यालयाशी थेट संपर्क साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून प्रत्यक्ष आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली होती. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली. परंतु एका सामान्य नागरिकाच्या एका साध्या विनंतीची दखल स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी घेऊन आपला वैयक्तिक शुभेच्छा संदेश स्पीड पोस्ट च्या माध्यमातून मंत्री परिवाराला पाठवला. या पत्राची संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा ऐकावयास मिळाली. कारण परभणी जिल्ह्यात प्रथमच एखाद्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त थेट देशाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा मिळणे ही निश्चितच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

error: Content is protected !!