हर घर नर्सरी अभियानाचा प्रजासत्ताक दिनी शुभारंभ

0 47

 

सेलू, प्रतिनिधी – सेलू नगर परिषद व मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने सेलू शहरातील नागरिकांसाठी हर घर नर्सरी अभियानाचा शुभारंभ आज उपविभागीय अधिकारी तथा न.प.प्रशासक सौ अरूणा संगेवार मॅडम यांच्या हस्ते वृक्ष पूजन व रोपांच्या बिया लावून करण्यात आला. या अभियानात सेलू शहरातील सर्व कुटुंबांनी सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणासाठी हर घर नर्सरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

 

नगर परिषदेच्या वतीने नोंदणी केलेल्या नागरिकांना मोफत वृक्ष बिया व साहित्य देण्यात येणार असून परीक्षकांनी निवड केलेल्या कुटुंबाला नगर परिषदेच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री देविदास जाधव यांनी सांगितले.या शुभारंभप्रसंगी तहसीलदार श्री दिनेश झांपले,नायब तहसीलदार श्री प्रशांत थारकर यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

नोंदणी करत हर घरी नर्सरी अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांना वृक्ष बिया व साहित्याचे वाटप हुतात्मा स्मारक येथून करण्यात येणार असून नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करावी जेणेकरून २६ जानेवारी ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणाऱ्या हर घर नर्सरी अभियानात अधिकृत सहभाग नोंदवला जाईल व त्यापैकी निवडक कुटुंबांचा सन्मान केला जाईल अशी माहिती मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभिजित राजूरकर यांनी सांगितले.

 

या शुभारंभासाठी नगर परिषदेचे श्री कापुरे,कापसे,नवघरे व मोरया प्रतिष्ठानचे श्री सुजित मिटकरी,सदाशिव बर्वे,विनोद भगत आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!