लेकीच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिनामाचा गजर,अंचलगावात ज्ञानयज्ञ सोहळा

0 22

कोपरगाव,दि 13 ःभागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत. कथेतून मानवी जीवनाच्या उद्धाराचं शास्त्र सांगितलं आहे. भागवत ग्रंथ म्हणजे अलौकिक ज्ञानयज्ञ सोहळा आहे. मनुष्याच्या जीवनात भागवत ग्रंथाचं स्थान दीपस्तंभासारखं आहे. जीवनात पूर्णेतेसाठी मनुष्यानं भागवत ग्रंथाचा सार आत्मसात करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प मनोहर महाराज ठाकरे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील श्री श्रेत्र अंचलगाव येथे स्व. कोमल आप्पासाहेब शिंद यांच्या 6 व्या पुण्यस्मरणानिमित्ताने शिंदे परिवार आणि अंचलगाव ग्रामस्थांच्या वतीने भागवत कथ भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवताचार्य मनोहर महाराज ठाकरे यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचं श्रवण करण्यासाठी अंचलगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.सप्ताह काळात दैनंदिन नित्यविधी, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ पठणामुळे अंचलगावातील वातावरण भक्तिमय झाले होते. कथेच्या सांगतेनंतर आंचलगाव परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजरात ग्रंथांची शोभायात्रा काढण्यात आली. काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.सप्ताह काळात राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जून कोकाटे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,कापसे उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे, ह.भ.प जयवंत महाराज मोरे, साईकथाकार बाळकृष्ण महाराज सुरासे, सार्वजनिक वाचनालय चिचोंडीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, गोरखनाथ खराटे, पंडित मढवई, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे, रामनाथ पाटील, दिनकर दाणे, नितीन कदम,ज्ञानेश्वर कदम, भाऊसाहेब खिरडकर यांच्यासह आध्यात्मिक-सामाजिक क्षेत्रातील मान्यरांनी हजेरी लावली.

कोविड प्रकोपानंतर दोन वर्षांच्या कालखडानंतर अंचलगावात हरिनामाचा जयघोष दुमदुमला. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दादासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, रंगनाथ शिंदे, संजय जाधव, संदिप एंडाईत, हौशिराम बर्गे, डॉ.शुभम वराडे, देविदास शिंदे, मयुर शिंदे, किरण शिंदे आदी प्रयत्नशील होते.

error: Content is protected !!