भाजपा शिवडी विधानसभेतर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन

0 10

 

मुंबई,दि 16  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा – प्रभाग क्र. २०५ तसेच अस्तित्व आधार फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी भव्य आरोग्य शिबिर भाजपा कार्यालय, इमारत नं. २६ च्या बाजूला, अभुदय नगर, काळाचौकी येथे सकाळी ७:०० ते १०:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये इसीजी, मधुमेह, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल (शरीरातील चरबीचे प्रमाण), ब्लड प्रेशर, कान, नाक, घसा, त्वचारोग, स्त्रीरोग तपासणी विनामूल्य होतील.
तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून पाइल्स (मूळव्याध), फिस्तूला, हर्निया, फिशर, अपेंडडिक्सच्या पहिल्या १० रुग्णांचे विनामूल्य ओपरेशन करण्यात येईल.
सदर शिबिरासाठी डॉ. आकाश भटजीरे (भाजपा मुंबई मेडिकल सेल समन्वयक), डॉ. वैशाली शेलार, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती गणेश बाळकृष्ण शिंदे (प्रभाग अध्यक्ष – २०५), जान्हवी जगदीश राणे (महिला प्रभाग अध्यक्षा), सिद्धेश संजय वाकडे (युवा प्रभाग अध्यक्ष) यांनी केली आहे.

error: Content is protected !!