आखाडा बाळापुरात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त आशा ताईंची आरोग्य तपासणी

0 116

 

आखाडा बाळापूर,दि 07 (प्रतिनिधी ) ः
आखाडा बाळापुर ता.कळमनुरी   येथे गुरुवार (दि.सात)ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने आ बाळापूर ग्रामीण रुग्णालयात तील आरोग्य सेवेचा महत्त्वाचा कना असलेल्या तसेच आरोग्य सेवा घरोघरी जाऊन उपलब्ध करुन देत अथक परिश्रम घेणाऱ्या आशा ताईंची आरोग्य तपासणी करण्यात आली . ज्या आशा आपल्या आरोग्यासाठी कधी विचार न करता इतरांच्या आरोग्य सेवे साठी धडपड करत असतात , त्यांचीच आज आरोग्य तपासणी करण्यात आल्या मुळे समाधान व समर्पणाची भावना तांच्यात निर्माण झाली होती. या आरोग्य तपासणी साठी आ बाळापुर ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिकारी डॉ.पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कावरखे, के .पी. शेवाळकर , विशाल तायडे , रेखा बनसोडे , रेणुका देशपांडे यांनी यावेळी सहकार्य केले . बहुतांश अशां या वेळी उपस्थित होत्या .

error: Content is protected !!