अबब… स्पर्धा जिंकली म्हणून १११ महिलांना चक्क हेलिकॉप्टरची राईड

0 241

पुणे, प्रतिनिधी – नवरात्रोत्सवामध्ये वेगवेगळ्या गणेश विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पुण्यातही एका मंडळाने उखाणे स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये ज्या महिला विजयी होतील त्यांना थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात येईल, असे या मंडळाने सांगितले होते. नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन उखाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टरची राइड घडवली गेली.

shabdraj reporter add

उखाणे स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना चक्क हेलिकॉप्टरची राईड मिळाली. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यातर्फे आयोजित स्पर्धेत जिंकलेल्या 111 घरकामगार महिलांना हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या महिलांचा आनंद ‘गगनात’ मावेनासा झाला.नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन उखाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या 111 घरकामगार महिलांनी मोफत हेलिकॉप्टरची सफर केली. जनता वसाहत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अॅड. योगेश आढाव आणि निर्मल फाउंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं होतं.

नवरात्रौत्सवानिमित्त ही ऑनलाईन उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उल्लेखनीय ठरलेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नवरात्रौत्सवाची ऑनलाईन उखाणा स्पर्धा पार पडली आणि त्यात सहभागी झालेल्या 111 महिलांनी आज हेलिकॉप्टर सफर केली.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि विजेत्या स्पर्धकांना कोणी हेलिकॉप्टर राईड देतंय कोणी गाड्या भेट देतोय तर कोणी बालाजी दर्शन घडवतं आहे. त्यात मनसेही कुठे मागे राहिली नाही. मनसे नेते राज ठाकरे यांनी ही पुण्याकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे भावी उमेदवार ही कुठे कमी नाहीत हे आजच्या राईड वरून दिसून येत आहे. हा आगळावेगळा उपक्रम मनसेने हाती घेतला असला तरी याचं मतदानात किती रूपांतर होतं हा येणारा काळच ठरवेल.

error: Content is protected !!