आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात हिंदी पंधरवाडयाचा समारोप

0 53

सेलू,दि 29 (प्रतिनिधी)ः
येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने 14 ते 29 सप्टेंबर या काळात हिंदी पंधरवाडा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आज दिनांक २९ सप्टेंबर गुरुवार रोजी या हिंदी पंधरवाडाचा समापन समारोह कार्यक्रम घेण्यात आले
यामध्ये अधिकत्तम हिंदी शब्द स्पर्धेत प्रथम जाकेर शेख , द्वितीय,गोपाळ गाडगे तर तृतीय भालचंद्र बरडे
निबंध स्पर्धेत प्रथम,शमशोदिन शेख ,द्वितीय पांडे मन्मथ , तर तृतीय, अमोल जाधव यांनी क्रमांक पटकाविले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कोडगिरकर (शाखा प्रबंधक )तर प्रमुख अतिथी सुभाष मोहकरे उपस्थितीत होते,या प्रसंगी सुभाष मोहकरे यांनी हिंदी भाषे चे महत्त्व विषद करतांना स्पष्ट केले की , आपल्या देशात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा असून ही लवचिक भाषा आहे, जगात आणि देशात अनेक भाषा आहेत .
आणि हिंदी ही राष्ट्रभाषा असुन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी हिंदी भाषेची गरज आहे, असे विचार व्यक्त केले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले, या वेळी, भुषण बक्षी, रामचंद्र साखरे अविनाश जोशी, सुनील वाकडे, शमशोदीन शेख, भास्कर् हिप्परगे, शिवाजी अघाव, अजय पुंडलिक, सुभाष दाभडकर, अनिल यादव,जाकेर शेख, नामदेव मुंढे,अमोल जाधव, अरूण चाटे, भालचंद्र बरडे, सुबोध पांडे, मन्मथ देवडे, अरूण साळवे, शंकर जिवने, गजानन वाकडीकर, शेख आमिर, नितीन भिसे, गोविंद कारके आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव केले आभार प्रदर्शन भास्कर हिप्परगे केले

error: Content is protected !!