हिंगलाज देवी मातेचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

0 109

रामभाऊ आवारे
निफाड,दि 17 ः
निफाड तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उगाव (खेडे) येथील हिंगलाज नगर मधील हिंगलाज मातेचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती हिंगलाज माता देवी ट्रस्ट अध्यक्ष शंकरराव कोल्हे खेडेकर यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे हिंगलाज मातेचा जन्मोत्सव शाकंभरी पौष पौर्णिमाचे औचित्य साधत साजरा केला जातो. परंतु करण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत परिसरातील भाविकांनी अत्यंत शांततेने व सोशल दिस्तन्स चा अवलंब करत दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सहा वाजता हिंगलाज देवी भाविक श्री विष्णू सहकारी महाले व मोतीराम सखाहरी महाले या दोन जोडप्यांनी सापत्निक देवी मातेची पूजा करून देवीची आराधना केली. ज्या विधिवत पूजनानंतर हरिभक्त परायण ज्योतीताई महाराज जगताप (वाकी) यांचं सुश्राव्य प्रवचन घेण्यात आले.यावेळी हरिभक्तिपरायण ज्योतीताई जगताप यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र हिंगलाज नगर येथील हिंगलाज देवी मातेच्या उगमस्थानापासून तर जन्मोत्सव व त्यांच्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल भाविकांना माहिती सांगून सर्व श्रोतुवर्गाला मंत्रमुग्ध केले. त्यानंतर दुपारी ११.५१ वाजता हिंगलाज देवी मातेचा जन्मोत्सव साजरा करताना महाआरती व देवी मातेला महानैवेद्य दाखवून दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हिंगलाज माता देवी मंदिराचे पुजारी विष्णू हरिहर पंगे, अविनाश पंगे, हर्षद पंगे व अनिरुद्ध पंगे यांनी षोडपचार पुजा करून हिंगलाज माता शाकंभरी पौर्णिमा २०२२ जन्मोत्सव निमित्त देवीमातेला विविध फळभाज्यांची सजावट केली होती.त्याचप्रमाणे कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांवर आलेली संकटे दूर होण्यासाठी देवीच्या कृपेने सर्व कृषी क्षेत्रातील बंधूंना व्यवसायात भरभराट होवो यादृष्टीने देवीला अर्पण केलेले वेगवेगळी फळे भाज्या अर्पण करण्यात आले.
हिंगलाज माता जन्म उत्सवाच्या वेळी हिंगलाज माता देवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी शासनाच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी मंदिर व मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळवून दिला.

error: Content is protected !!