साळवा गावच्या अंजलीने रचला गुजरातमध्ये इतिहास; ज्यूदो राष्ट्रीय लीगमध्ये पटकविले सुवर्णं पदक

0 115

आ. बाळापूर, आनंद बलखंडे – कळमनुरी तालुक्यातील छोटे खडेगावं असलेल्या मौजे साळवा येथील रहिवासी असलेल्या बालाजी बाभुळकर् यांची अंजली ही मुलगी आहे. अंजली चा मौजे साळवा ते छत्रपती शिवाजी क्रीडा प्रबोधिणी म्हाळुंगे बानेवाडी पुणे आणी त्या नंतर राष्ट्रिय स्तरा वरील ज्यूदो लीगमध्ये पटकविलेले सुवर्ण पदक याचा हा रंजक प्रवास थोडक्यात जाणून घेऊया.

 

अंजली चे प्रार्थमिक शिक्षण गावातील छोटया शा जिल्हा परिषद शाळेत झाले. अंजली लहान पणा पासून चपळ व काटक होती, शिवाय तिचा खेळा कडे विशेष कल होता. गावातील शाळा सुटल्या वर ती तासन्तास मैदानात खे खेळत असायची यामुळे कधीकधी तिला आई आणी बाबाची बोलणी ही खावी लागत असे. वडील नेहमी तिच्या मैदानात खेळण्यामुळे त्रागा करायचे. पण तिचे पोलीस मधील असलेले होमगार्ड काका बळीराम बाभुळकर यांनी तिच्यातील खेळाचे गुण हेरले व पुढील शिक्षनासाठी तिला तालुक्यातील कैें . शिवरामजी मोघे सैनिकि स्कूल कलमनुरि इथे प्रवेश मिळून दिला. त्यांचा मुलगा मंगेश हा रायफल शुटर असून भारतीय रेल्वे कडून खेळतो अंजली च्या क्रीडा क्षेत्रातील गुनांना इथूनच वाव मिळाला.

 

शाळेतील शिक्षक श्री वाणरे सर, बंडे सर, पोहरे सर, ठोके सर यांनी मेहनत घेऊन तालुकास्तरिय् व जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी नेत् राहिले. अंजलीनेही आपले कोशल्य पणाला लावून अवलं क्रमांक मिळवत यश मिळवले. क्रिडासंकुल हिंगोली येथील क्रिडा अधिकारी किशोर पाठक, कर्मचारी वसीम सर, बेठेवार सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. यामुळे अंजलीची पुणे येथील क्रीडा प्रबोधिणीमध्ये निवड झाली. इथे तिच्या स्वप्नाना खऱ्या अर्थाने पंख फुटले. तज्ञ क्रीडा मार्गदर्शनाखाली तीने ज्यूदो खेळाची निवड केली व मेहनत कामाला आली. तिने राजस्थान राज्यात झालेल्या स्पर्धां मध्ये सुद्धां सुवर्ण पदक मिळवले आहे.

 

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई ) यांच्या वतीने मेहसांना ( गुजरात )येथे नुकत्याचं झालेल्या खेलो इंडिया महिला ज्यूदो राष्ट्रीय लीग व मनाकणं स्पर्धे ची सांगता झाली. या मध्ये 57 किलो गटा मध्ये अंजली बालाजी बाभुळकर हिने सुवर्णं पदक पटकविले आहे. अंत्यन्त प्रतिकूल व कुठलीही मोठी क्रीडा पार्शवभूमी नसताना तीने ग्रामीण भागातून यश मिळवले आहे ही बाब कौतुकास्पद् आहे . अंजली ची कोटुंबिक स्तिती फारशी बरी नाही , तिच्या भविष्यातील क्रीडा स्पर्धां साठी मदतीची खरच गरज आहे. बालाजी बाभूळ कर , हे पुणे इथे मजुरी काम करतात, काका बळीराम बाभुळ कर यांनी मात्र अंजली ला अंतरराष्टीय स्प्रधे मध्ये पाठवणारच असा आत्मविश्वास सदर प्रतिनिधी शी बोलताना वैक्त केला आहे.

error: Content is protected !!