करिअरच्या विविध संधी देणारे ‘होम सायन्स’
होम सायन्स म्हटलं की सर्वांच्या समोर होम हा एकच शब्द दिसतो. पण सायन्स ह्या शब्दाकडे लक्ष दिल्यानंतर समजतंं की खरंच जीवनउपयोगी अभ्यासक्रम आहे हा. होमसामन्सची सुरुवात विद्यार्थीनींना 11 वी पासुनच करता येते. 11 वी व 12 वी झाल्यानंतर पुढे बी.एससी. होमसायन्स करून खूप नवनवीन सुवर्णसंधी विद्यार्थीनींना उपलब्ध आहेत . सर्वच मुली डॉक्टर्स, इंजिनीयर होऊ शकत नाही, किंवा बर्याचवेळा आपल्याला नवीन काहीतरी करण्याची खूप धडपड असते. अशा होतकरू मुलींसाठी मी तर म्हणेन होमसायन्स हे परफेक्ट फील्ड आहे.
आमच्या श्रीमती हिराबेेन मनीलाल नानावटी ज्युनिअर कॉलेज ऑॉफ होमसायन्स, माटुंगा, मुंबई या महाविद्यालयात फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, होम मॅनेजमेंट हे विषय 11 वी ब 12 वी ला सायन्ससोबत शिकविले जातात, जिथे फिजीक्स आणि मॅथ हे दोन विषय कमी केलेले असतात. आज एक गोष्ट वेळेने शिकविली आहे ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अन्न कमविणे आणि खाणे. कोणतीही परिस्थिती येऊ दे शेवटी अन्न हे परब्रम्ह आहे आणि हीच गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून आम्ही मुलींना शिकवितो. होमसायन्स म्हणजे घरातील कामे नसून फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, होम मॅनेजमेंट , टेक्सटाईल, ह्यूमन डेव्हलपमेंट इ. विषयांचा वैज्ञानिक अभ्यासक्रम आहे.
डायटेशियन, न्यूट्रशनिस्ट, मर्चनाडाझर, हॉटेल मॅनजर किंवा एयरलाईन फ्रण्ट डेस्क जॉब अशा अनेक संधी मुलींसाठी उपलब्ध आहेत.
गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मविश्वासाची, आणि मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळंं करणारी मुलगी आहे हे दाखविण्याची आता वेळ आहे. सगळं जग एकाच विषयाकडे धावलं म्हणून आपणही तोच अभ्यासक्रम आंधळेपणाने निवडतो हा आपला निव्वळ वेडेपणा ग्रॅज्युवेशन झाल्यानंतर समजतो की आता पुढे काय? उठा मुलींनो, जागे व्हा. होमसायन्स तुमच्या आयुष्यात चांगली संधी घेवून येत आहे. त्याचं सोनं करा आणि स्वतःला ‘हम भी किसी से कम नहीं’ हे सिद्ध करून दाखवा.
– प्रा.अहिल्या विकास माळी
श्रीमती हिराबेेन मनीलाल नानावटी ज्युनिअर कॉलेज
ऑफ होमसायन्स, माटुंगा, मुंबई
मोबाईल नं . 7208819099