प्रामाणिक व चांगले कामच ध्येयपूर्ती करेल-सौ.भावनाताई नखाते-श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन

0 70

परभणी दि.25
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजन, कौशल्य आणि आत्मविश्वासाने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी समोर जाणे गरजेचे आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच आपले व्यक्तिमत्व आदर्श कसे घडेल याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच प्राध्यापकांनी चांगले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन संमेलनातून त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देऊन स्नेहसंमेलनात सादरीकरण करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून सादरीकरण करणे सहभागी होणे गरजेचे असत.कारण स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडतो आणि प्रामाणिक व चांगले काम त्यांना ध्येयपूर्ती कडे घेऊन जाते कारण, प्रामाणिक व चांगले कामच आपली ध्येयपूर्ती करेल असे प्रतिपादन परभणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. भावनाताई नखाते यांनी 25 जून 2022, शनिवार रोजी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन (युवाबीट-2022) बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी व्यासपीठावर सौ. भावनाताई नखाते , स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य श्री रणजीत काकडे ,श्री नारायण चौधरी , संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर ,प्राचार्य प्रा. सतीश पाईकराव प्रा. अनुराधा निकम यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धा क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, चेस, टेबल टेनिस, कॅरम आदी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी केले . सूत्रसंचालन वेदांत ठोंबरे व आर्या जांबुटकर तर प्रा. सतीश पाईकराव यांनी आभार मानले . यावेळी कार्यक्रमास विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी तसेच कलाप्रेमी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवाबीट समन्वयक समितीने यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!