बंधूभाव जोपासण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी भारत भ्रमंतीवर असणाऱ्या रोहन अग्रवालचा सत्कार

0 15

हिंगणघाट-वर्धा –यदी हौसले बुलंद हो तो हर मंजील आसान हो जाती है! ‘ असं म्हटल्या जातं आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे उपराजधानीतील कामठी येथे राहणारा एकोणीस वर्षीय युवक रोहन अग्रवाल. देशातील विविध धर्म जातींना समजून घेण्यासाठी,बंधूभावाचे नटे दृढ करण्यासाठी आणि प्लास्टिक निर्मुलनाचा संदेश देण्यासाठी रोहन अग्रवाल हा भारत भ्रमंतीवर निघालेला आहे.विशेष म्हणजे त्याने ही भ्रमंती पायी करण्याचा निर्धार केला आहे.२५ आॕगस्ट २०२० ला वाराणसी येथे गंगास्नान करून हरहर गंगे म्हणत रोहन देशाटनाला निघाला.देशाटन प्रवास केला पाहिजे असे अगदी लहानपणापासूनच त्याचे स्वप्न होते.नागपूरच्या गोसे अर्थ वाणिज्य महाविद्यालयात बी काॕम द्वितीय वर्षाला शिकत असतांना ही बाब त्यांने आपल्या आई वडिलांना सांगितली आणि आपल्या स्वप्नपूर्तीसाठी एका बॕगेत दोन जोडी कपडे,एक जोडी चप्पल ,पाण्याची बाॕटल आणि खिशात फक्त २५००रूपये घेऊन तो देशाटनाला निघाला.वाटेत रोहनचे एक हजार रूपये चोरीला गेले पण न डगमगता त्यांनी आपला हा प्रवास सुरू ठेवला.काही वेळा पोटाची खळगी भरण्यासाठी आहे त्या जागेवर काम करण्याची वेळही त्याच्यावर आली.

 आहे.आतापर्यंत रोहनने उत्तर प्रदेश,राजस्थान,हरियाणा,दिल्ली ,चंदीगड,हिमाचल प्रदेश ,मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश,तेलंगना,कर्नाटक,गोवा,पांडीचेरी,महाराष्ट्र असा सोळा राज्याचा प्रवास केलेलाआहे. त्यासाठी त्याने दहा हजार किमी पायी प्रवास तर इतरांना लिप्ट मागत चाळीस हजार किमी प्रवास वाहनातून केला आहे.आज त्याचे हिंगणघाट येथे आगमन झाले असतांना निसर्ग मित्र हौशी सायकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी डाॕ,बी,आर.आंबेडकर विद्यालयात रोहनचे स्वागत केले.योगायोगाने रोहनचा आज वाढदिवसही असल्याने रोहनला केक भरवून त्याच्या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी हौशी सायकल क्लबचे दिनेश वाघ,गोपाल मांडवकर,विलास भोमले,चित्तरंजन बुरीले,संजय खंते,प्रमोद चौधरी व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी रोहनने आपल्या देश भ्रंमतीचा उद्देश समजावून सांगितला आणि भ्रमंतीच्या अंतीम टप्यात देशातील सर्वात थंड देश म्हणजे सायबेरीयात पायी जाण्याचा मानस व्यक्त केला.

error: Content is protected !!