पूर्णा येथे नगर पालीकेत महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

0 151

पूर्णा:(सुशिलकुमार दळवी )   पूर्णा नगर परिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शनिवारी (दि.10)  जागतिक महिला दिनानिमित्त  सर्व सफाई महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पूर्णा नगर परिषदचे मुख्याधिकारी तुकाराम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नविन संकल्पेतून सफाई महिला कर्मचारी यांना पुषपगुच्छ देहून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देवुन साजरा करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व सफाई महिलां कर्मचाऱ्यांचे स्वच्छता सलग्न कार्यक्रम 30 मार्च 2023 पर्यंत घेण्यात येणार आहेत .
महिला चॅम्पियन्स इन स्यानिएशन कॉमपिटेशन.,
स्वच्छ्ता जनजागृती यात्रा.
जागर स्त्रीत्वाचा (स्वच्छ मशाल)
शून्य कचरा कार्यक्रम
कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे ला उपस्थित प्रशासकीय अधिकारी बाबर खान अब्दुल हमीद खान पठाण , कार्यालयीन अधीक्षक उत्तम बन्सी कांबळे,अभियंता . सिद्धार्थ गायकवाड , शहर समन्वयक . बाळु सुभाष खोंसे , सहाय्यक प्रकल्प अधिकारीश्रीमंती अंजणा बीडकर , समुदाय संघटक श्रीमंती पुष्पा बनसोडे तसेच सर्व स्वच्छता महिला कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले.

error: Content is protected !!