चौकशी अहवालानुसार त्वरित कार्यवाही करावी- धनेगाव ग्रामस्थांची मागणी

1 136

सेलू ,दि 26 ः
तालुक्यातील धनेगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबाबत तसेच चौकशी अहवालानुसार ग्रामसेवकास त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे .
ग्रामसेवकाची सतत गैरहजेरी ,घरपट्टी वसुलीतील गैरप्रकार ,रोजगार सेवकाच्या मानधनावर सह्या न करणे ,ग्राम पंचायत सदस्यांचे मानधन ,घरकुल योजनेत संगनमत करून यादीतील गोंधळ ,याबाबत सखोल चौकशी होई पर्यंत १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करू देऊ नये अशी तक्रार कांही नागरिकांनी केली होती .व अनुषंगाने याबाबतच्या सखोल चौकशी एका टीम दि १३/१०/२२ रोजी धनेगाव येथे गेली होती .यामध्ये विस्तार अधिकारी पी एन शिंदे ,कृषी विस्तार अधिकारी बी एस तोटेवाड व शाखा अभियंता टी बी इंगळे यांचा समावेश होता .यावेळी त्यांनी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचे अभिलेखे मागितले असता कुठल्याही प्रकारचे अभिलेखे अद्ययावत नाहीत असे तोंडी सांगून अभिलेखे दाखवण्यास टाळाटाळ केली .व आपण सर्व अभलेखे पंचायत समितीच्या पंचायत विभागात दर्शवितो असे ग्रामसेवक जाकापुरे एम आर यांनी सांगितले .परंतु आतापर्यंत अभिलेखे सादर केले नाहीत .
ग्रामपंचायतीचे अभिलेखे चौकशी समितीच्या समोर न दर्शवने ही गंभीर बाब असून प्रथमदर्शनी यात अपहार असल्याचेच दिसून येत आहे .त्यानुसार संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कार्यवाही करणे योग्य असल्याच्या अहवाल समितीने वरिष्ठांना सादर केलेला आहे .परंतु अजूनही या अहवालानुसार कार्यवाही झाली नसून त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे .
तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे प्रस्ताव प्रलंबित असून ग्रामसेवक सही करण्यास तयार असताना देखील १०००/- रुपयांची मागणी करीत सरपंच ग्रामसेवकाला सह्या करू देत नाही .त्यासाठी ग्रामसेवकाच्या सहीनेच हे प्रस्ताव सादर करून घेण्याची मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जी प परभणी यांच्याकडे करण्यात आली आहे .

error: Content is protected !!